संस्कृती बालगुडेची ठसकेबाज लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2016 10:07 IST2016-04-30T04:37:38+5:302016-04-30T10:07:38+5:30

मुनावर भगत दिगदर्शित निवडुंग या चित्रपटाची गेली कित्येक दिवस चर्चा आहे. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळ्या प्रकारची ...

Culture Ballet Sprinkler Planting | संस्कृती बालगुडेची ठसकेबाज लावणी

संस्कृती बालगुडेची ठसकेबाज लावणी

नावर भगत दिगदर्शित निवडुंग या चित्रपटाची गेली कित्येक दिवस चर्चा आहे. सामाजिक आशय असलेल्या या चित्रपटात एका वेगळ्या प्रकारची प्रेमकथाही पाहायला मिळेल. ही प्रेमकथा असणार आहे  पिंजरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे भूषण प्रधान व संस्कृती बालगुडे या जोडीचे. ही जोडी पुन्हा झळकणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी खूशखबर तर आहेच पण या ही पलीकडे जाऊन अभिनेत्री संस्कृतीची बालगुडेची ठसकेबाजी लावणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांचा आनंद व्दिगुणार होणार आहे.  चित्रपटातील माज्या ज्वानीला अंगभर भिजवा की ही झक्कास लावणीवर संस्कृती ठेका धरताना दिसणार आाहे.  गीतकार झहीर कलाम यांच्या लेखणीतून आकाराला आलेली ही लावणी उर्मिला धनगरच्या सुमधुर आवाजात संगीतकार रफिक शेख यांनी  संगीतबद्ध केली आहे. तर मेघा सपंत यांनी या लावणीसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.चला तर पाहूयात संस्कृतीची ही लावणी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करते का?


Web Title: Culture Ballet Sprinkler Planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.