‘बोबन अँड मॉली’चा निर्माता हरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 20:14 IST2016-04-28T14:44:32+5:302016-04-28T20:14:32+5:30

गेल्या चार दशकांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, निरागस विनोदातून हसवणाऱ्या ‘बोबन आणि मॉली’ या कार्टून पात्रांचे निर्माते व्ही टी ...

The creator of 'Boban and Molly' lost | ‘बोबन अँड मॉली’चा निर्माता हरवला

‘बोबन अँड मॉली’चा निर्माता हरवला

ल्या चार दशकांपासून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या, निरागस विनोदातून हसवणाऱ्या ‘बोबन आणि मॉली’ या कार्टून पात्रांचे निर्माते व्ही टी थॉमस यांचे निधन झाले.

87 वर्षीय थॉमस यांना सर्वजण ‘टॉम्स’ म्हणून ओळखत. वृद्धपकाळातील आजारापणावर ते खाजगी हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा मुलं असा परिवार आहे.

टॉम्स यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘मलायल मनोरामा’ या दैनिकातून 1961 साली केली. अगदी 1987 मध्ये निवृत्त होईपर्यंत ते तिथेच काम करीत होते. दैनिकाच्या शेवटच्या पानावर या कार्टून पात्रांची स्ट्रिप प्रकाशित होत असे.

निवृत्त झाल्यावर ‘बोबन अँड मॉली’च्या कॉपीराईटवरून त्यांचा दैनिकाशी वाद झाला. कायदेशाीर लढाईत सुप्रीम कोर्टाने दैनिकाला सर्व हक्क बहाल केले. परंतु दैनिकाने टॉम्सचा ते हक्क बहाल करून टाकले.

त्यानंतर त्यांनी स्वत:च्या मॅगझीनमध्ये पुन्हा एकदा ‘बोबन अँड मॉली’च्या करामती, गंमतीजमती वाचकांपुढे मांडल्या. 

Web Title: The creator of 'Boban and Molly' lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.