झाला बोभाटा चित्रपटाच्या शीर्षकाचा वाद कोर्टात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 14:16 IST2017-01-12T14:16:52+5:302017-01-12T14:16:52+5:30
झाला बोभाटा चित्रपटाला एकीकडे रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात एक करोडवरून जास्त कमाई केली आहे. ...
.jpg)
झाला बोभाटा चित्रपटाच्या शीर्षकाचा वाद कोर्टात
झ ला बोभाटा चित्रपटाला एकीकडे रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात एक करोडवरून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, कमलेश सावंत, संजय खापरे अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. तर मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल या नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांची हटके भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील पैंजण या गाण्यानेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
तर दुसरीकडे चित्रपटाचा शीर्षकावरून वाद चांगलाच रंगला आहे. बोभाटा हे शीर्षक माज्या कांदबरीचे असून हे शीर्षक वापरल्याने चित्रपट निर्मात्यांनी नुकसान भरपाई द्यावी त्याच बरोबर हे शीर्षक अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात नोंदवले आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोभाटा कादंबरीचे लेखक नवनाथ माने यांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे चित्रपट निर्मात्यांचे वकील शंकर यादव यांनी सांगितले.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे या संदर्भात नाराजी व्यक्त करत बोलले की आम्ही अत्यंत मेहनतीने चित्रपट बनवतो. यामागे खूप कष्ट असते. कोणत्याही पुराव्याशिवाय असे कोणीही उठ सुठ चित्रपटाविषयी तक्रारी करत असेल तर आम्ही कसे काम करणार. चित्रपटाचे प्रमोशन करायचे की कोर्टात जायचे.
या याचिकेची सुनावणी २ फेब्रुवारीला होणार आहे. निर्मात्यांचे वकील शंकर यादव म्हणाले की आमच्या अशीलाला झाल्याले त्रासाबद्दल आम्ही माने यांच्या विरोधात योग्य पाउल उचलू. अशी माहिती त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दिग्दर्शक अनुप जगदाळे, कार्यकारी निर्मात्या दीपाली अंबिका, अविनाश जाधव, हर्षद जाधव यावेळी उपस्थित होते.