'नगरसेवक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 20:02 IST2017-02-28T07:56:31+5:302017-03-31T20:02:00+5:30

राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो... तो म्हणजे नगरसेवक.

'Corporator' soon met the audience | 'नगरसेवक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला

'नगरसेवक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला

 
राठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठया समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडण्यात आले आहे. राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. लोकशाही ही लोकहिताची न राहता ती जेव्हा सत्ताधीशांच्या हिताची ठरते तेव्हा त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी याच लोकांमधला एक नायक पुढे यावा लागतो... तो म्हणजे नगरसेवक. राजकारण व समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. म्हणूनच या भाष्यावर आधारित लवकरच नगरसेवक एक नायक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. जश पिक्चर्स प्रस्तुत शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक कदम यांनी केले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. 
   


समाजकारण हे राजकारणाचं मुळ असायला हवं. मात्र सध्या सत्ताकारण हेच राजकारणाचं मुळ असतं असं दिसतंय. समाजातील विघातक प्रवृत्ती आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी किती घातक होऊ शकते हे दर्शविण्याचा प्रयत्न नगरसेवक मधून केला गेला आहे.तसेच या चित्रपटात अन्याय व अत्याचाराविरोधात आवाज उठविणाºया मल्हार या तरुणाची कथा पहायला मिळणार आहे. या मल्हारची भूमिका उपेंद्र लिमये यांनी साकारली आहे. मुंबईत नव्याने दाखल झालेल्या मल्हारचा अनपेक्षितपणे राजकारण्यांशी संबंध येतो. पुढे अशा काही घटना घडतात की तोच निवडणुकीच्या रिंगणात उभा राहतो. ३१ मार्चला नगरसेवक हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Web Title: 'Corporator' soon met the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.