Corona Virus :कोरोनामुळे प्रकाशझोतात आली ही मराठी अभिनेत्री, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:10 IST2020-03-17T13:03:39+5:302020-03-17T13:10:26+5:30
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

Corona Virus :कोरोनामुळे प्रकाशझोतात आली ही मराठी अभिनेत्री, जाणून घ्या कारण
कोरोनाच्या प्रकोपामुळे जणू संपूर्ण जग थांबले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुबोध भावे, मिथिला पालकर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. यांत मराठी कलाकारही सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसतायेत.
सगळीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण असताना अभिनेत्री अमृता सुभाषने मात्र सुरक्षितरित्या यातून आपण बाहेर पडू शकतो असे धीर देणारे आणि प्रेरणा देणारे एक गाणे प्रदर्शित केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अमृता सुभाषने लिहीले आहे की, हे गाणं माझा दिग्दर्शक मित्र सुनील सुकथनकरने लिहीलं आहे. आपण काळजी तर घेतोच आहोत. सर्वांच्या आरोग्यासाठी ही प्रार्थना.