Corona Virus:कोरोना दहशतीतही या मराठी अभिनेत्रीने घडवली तिच्या पालकांना विमान सफर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 12:10 IST2020-03-20T12:03:04+5:302020-03-20T12:10:16+5:30
अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

Corona Virus:कोरोना दहशतीतही या मराठी अभिनेत्रीने घडवली तिच्या पालकांना विमान सफर, वाचा सविस्तर
जगभरात पसरलेला कोरोनाव्हायरसने भारताही शिरकाव केला आहे. ज्याप्रकारे कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत त्याचप्रमाणे लोकांमध्ये कोरोनाबाबत जागरुकता वाढत आहे. या व्हायरसपासून बचावासाठी सर्वच सेलिब्रेटी विविध प्रकारे काळजी घेताना दिसत आहे. कोरोनामुळे काहींनी स्वतःला सेल्फ क्वॉरेंटाइन म्हणजेच एका बंदिस्त खोलीत बंद करून घेत संपर्कात येणे टाळत आहेत. घरीच राहून योग्य काळजी घेत आपण हा संसर्ग टाळु शकतो. असेच सर्व स्थरांवरून सुचना दिल्या जात आहेत. अशात मात्र मराठी अभिनेत्री माधवी निमकरने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
संपूर्ण जग थांबले असून माधवीने मात्र तिच्या आई- बाबांना पहिल्यांदा विमान प्रवास घडवल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटोत दिसत असल्यानुसार माधवीच्या आई -बाबांच्या हातात मास्क दिसत आहे. त्यामुळे हा फोटो जुना नसून आत्ताचाच असल्याचे स्पष्ट दिसत आहे. माधवीसाठी हा क्षण अभिमानास्पद असला तरी ही योग्य वेळ नसून स्वतःची काळजी घेणे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवणे हे महत्वाचे आहे. तसेच कोरोनाचा धोका हा वयोवृद्ध आणि लहानमुलांना आहे त्यामुळे सर्वांनीच अशा परिस्थितीत आपल्या आसपासच्या लोकांसाठीदेखील आपण जबाबदारीने वागले पाहिजे आणि खबरदारीही घेतली पाहिजे. अशा सुचना शासनाकडून देण्यात येत आहेय तरीही काहींना मात्र याचे गांभिर्य नसून सगळे नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या प्रकोपामुळे जणू संपूर्ण जग थांबले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
अनेक बॉलिवूड आणि मराठी सेलिब्रेटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या व्हायरस बाबत काळजी घ्या अशा आशयाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यात प्रियांका चोप्रा, सलमान खान, अक्षय कुमार, कतरिना कैफ, सुबोध भावे, मिथिला पालकर, स्वप्नील जोशी इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. यांत मराठी कलाकारही सोशल मीडियाद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसतायेत.