प्रशांत करणार कन्फ्युज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 14:09 IST2016-08-30T08:39:49+5:302016-08-30T14:09:49+5:30
प्रशांत चंद्रकांत सुर्वे दिग्दर्शित कन्फ्युज हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वा प्रॉडक्शन निर्मित कन्फ्युज हा चित्रपट ...

प्रशांत करणार कन्फ्युज
प्रशांत चंद्रकांत सुर्वे दिग्दर्शित कन्फ्युज हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वा प्रॉडक्शन निर्मित कन्फ्युज हा चित्रपट आहे. अनाथ मुलांची हदयस्पर्शी कथा, प्रेम , डान्स या विषयांवरती भाष्य करणारा हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात अभिजीत सोनावणे, पुण्यकर उपाध्याय, रक्षंदा थुल हे कलाकार मुख्य भुमिकेत पाहायला मिळतील. या चिञपटामध्ये तीन गाणी असून यामध्ये एक आयटम सॉग आहे. प्रशांत चंद्रकांत सुर्वे यांनी चिञपटाची कथा पटकथादेखील लिहिली आहे. चिञपटाची निर्मिती सचिन सांळुखे आणि प्रशांत सुर्वे यांची आहे. चित्रपटाचे एक्सिक्टिव्ह प्रोड्युसर राहुल कांबळे यांनी बघितले आहे.सिनेमॅटोग्राफी मयुरेश जोशी यांनी केली आहे.संगीत मोनू अजार्मेरी,राजू म्हासेकर,गुरू मेहेर यांचे असून दर्शन सारोलकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. सुरेखा खुडची,माधव अभ्यंकर , राहुल लोहगावकर प्रसाद सुर्वे,राहुल बेलापुरकर,शर्वरी लोकरे,धनंजय निकम,आशुतोष वाडेकर, आदि कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे गीतकार सचिन तळे,आणि संगीतकार आदर्श शिंदे आहेत.