कंडिशन्स अप्लाय होणार लवकरच प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 15:48 IST2017-07-05T10:18:13+5:302017-07-05T15:48:13+5:30

संवाद, सहवास यातून नाती रुजतात. पण व्हॅाटसअप, फेसबुकच्या जमान्यात त्यांच्याही व्याख्या बदलत चालल्या आहेत. यातूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय ...

Conditions will be applied shortly | कंडिशन्स अप्लाय होणार लवकरच प्रदर्शित

कंडिशन्स अप्लाय होणार लवकरच प्रदर्शित

वाद, सहवास यातून नाती रुजतात. पण व्हॅाटसअप, फेसबुकच्या जमान्यात त्यांच्याही व्याख्या बदलत चालल्या आहेत. यातूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय आजची पिढी बेधडकपणे स्वीकारू लागली आहे. प्रेमाच्या याच नव्या कल्पनांचा, प्रवाहाचा वेध घेणारा कंडिशन्स अप्लाय-अटी लागू हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डॉ संदेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केले आहे.
अभय आणि स्वरा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि लग्नाच्या बंधनात न अडकता एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. मात्र हा निर्णय घेताना ते एकमेकांवर आणि स्वत:वर कोणत्या अटी घालतात. या अटीमुळे त्यांच्या नात्यावर काही परिणाम होतो का? हे सांगू पाहणारा सिनेमा म्हणजे ‘कंडिशन्स अप्लाय’.
कंडिशन्स अप्लाय-अटी लागू या चित्रपटातील गीतांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली ही गीते आनंद शिंदे, विश्वजीत जोशी, रोहित राऊत, प्रियंका बर्वे, फरहाद भिवंडीवाला, गंधार कदम यांनी गायली आहेत.
या चित्रपटात सुबोध भावे आणि दीप्ती देवी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांची जोडी जमली आहे. या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सुबोध आणि दीप्तीच्या रूपाने नवी जोडी मिळाली आहे. 
‘कंडिशन्स अप्लाय’ मध्ये सुबोध भावे आणि दिप्ती देवीसोबतच अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा यांच्या भूमिका आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचं असून संकलन निलेश गावंड यांचे आहे. सचिन भोसले, अमोल साखरकर, चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रसाद पांचाळ कार्यकारी निर्माते आहेत.

Also Read : ​दिप्ती देवी बनली रेडिओ जॉकी

Web Title: Conditions will be applied shortly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.