छंद प्रितीचा चित्रीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:51 IST2016-06-28T12:21:24+5:302016-06-28T17:51:24+5:30
प्रेम मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. प्रेमाचे हे महत्त्व ओळखून कोल्हापूरच्या प्रेमला प्रॉडक्शनने मराठीतील हरहुन्नरी व नवोदीत कलाकारांना घेऊन ...
.jpg)
छंद प्रितीचा चित्रीकरण पूर्ण
प रेम मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. प्रेमाचे हे महत्त्व ओळखून कोल्हापूरच्या प्रेमला प्रॉडक्शनने मराठीतील हरहुन्नरी व नवोदीत कलाकारांना घेऊन छंद प्रितीचा हा नवा तमाशाप्रधान मराठी चित्रपट आकारास आणला आहे. छंद प्रितीचा चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून तांत्रिक सोपस्काराचे काम पूर्ण होताच चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे.छंद प्रितीचा या संगीतमय चित्रपटाचे चित्रीकरण सांगली जिल्ह्यातील नांद्रे, वसगडे, ब्रह्मनाळ, भिलवडी, हरिपूर या रम्य ठिकाणी कृष्णामाईच्या परिसरात पूर्ण झाले असून कर्नाटकातील ऐतिहासिक बदामी येथेही काही उत्कंठावर्धक दृश्यांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. चित्रपटामध्ये हर्ष कुलकर्णी, सुबोध भावे, सुवर्णा काळे, शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव आदि कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाची अदाकारी या चित्रपटात पहाता येईल.