शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:35 AM2023-12-26T11:35:28+5:302023-12-26T11:37:48+5:30

सोशल मीडियावर शिवालीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

Comedy Queen Shivali Parab got emotional after performing on the stage recalling the days of struggle | शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक

शिवाली परबला आठवले संघर्षाचे दिवस; स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर कॉमेडी क्वीन भावूक

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.  सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच शिवालीने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.

 शिवालीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत तिने स्ट्रगलच्या काळातली आठवण सांगितली. ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यातला  पहिला इव्हेंट म्हणजे ‘आगरी महोत्सव’ हा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी या स्टेजवर परफॉर्म करत आहे. तेव्हा मी मागे असलेल्या ५- ६ मुलींच्या मध्ये उभी होते. आणि आज मी डायरेक्ट या कार्यक्रमामध्ये स्वत:चं स्किट सादर करत आहे'. 

शिवालीने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहले,'आगरी महोत्सव’ हा व्हिडीओ खास आहे. कारण की, मी ह्या मंचावर माझ्या स्ट्रगलच्या काळात एक स्कीट परफॉर्म केला होता आणि हा आगरी महोत्सव असिस्ट सुद्धा केला होता. त्या वेळेस सहकलार म्हणून ६ जणांमध्ये मी होते आणि आज त्याच मंचावर सेलिब्रिटी गेस्ट म्हणून स्वतःचं स्कीट परफॉर्म केलं… खूप छान वाटलं, थोडं मन भरुन आलं…. असंच तुम्हा सगळ्यांच प्रेम आणि आशिर्वाद माझ्यासोबत असू द्या… धन्यवाद'. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 


शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून शिवाली परब प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. शिवालीने मालिका व चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ‘प्रेम, प्रथा, धुमशान’ या चित्रपटात शिवाली मुख्य भूमिकेत दिसली होती. शिवालीने कॉलेज जीवनापासून नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. शिवाली तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती पोस्टमधून चाहत्यांना देत असते. 

Web Title: Comedy Queen Shivali Parab got emotional after performing on the stage recalling the days of struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.