कॉमेडियन सुनील पाल मराठी सिनेमांची देणार ट्रीट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 16:30 IST2017-04-08T11:00:23+5:302017-04-08T16:30:23+5:30

‘कुणी निंदा, कुणी वंदा, हसवणं हाच माझा धंदा’ या उक्तीनुसार कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल रसिकांचं मनोरंजन करत आहेत. ...

Comedian Sunil Pal will give Marathi cinematic treat! | कॉमेडियन सुनील पाल मराठी सिनेमांची देणार ट्रीट!

कॉमेडियन सुनील पाल मराठी सिनेमांची देणार ट्रीट!

ुणी निंदा, कुणी वंदा, हसवणं हाच माझा धंदा’ या उक्तीनुसार कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल रसिकांचं मनोरंजन करत आहेत. कुणालाही रडवणं खूप सोप असतं, मात्र रसिकांना हसवणं हे खूप आव्हानात्मक काम असतं. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सुनील पाल रसिकांना हसून हसून लोटपोट करत आहेत. सारं दुःख विसरुन जाण्यासाठी आणि रसिकांच्या जीवनात आनंदाचे चार क्षण आणण्यासाठी आपल्या हजरजबाबीपणाने आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आता रसिकांवर आणखी जादू करण्यासाठी सुनील पाल पुन्हा एकदा सज्ज आहेत. एखाद्या कॉमेडी शोमधून किंवा लाइव्ह कॉन्सर्टमधून सुनील पाल ते मनोरंजन करणार आहेत असं तुम्हाला वाटू शकतं. मात्र तसे काहीही नसून सुनील पाल रसिकांच्या भेटीला एक दोन नाही तर तीन-तीन सिनेमा घेऊन येत आहेत. या सिनेमांच्या माध्यमातून सुनील पाल रसिकांना मनोरंजनाची ट्रीट देणार आहेत.आगामी काळात सुनील पालचे तीन मराठी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.'एकच निर्धार', 'एक होता लेखक' आणि 'फॅमिली 420'  अशी या तीन सिनेमांची नावं आहे. प्रत्येक सिनेमा वेगळा आणि या सिनेमाची कथा वेगळी असणार आहे. त्यामुळे रसिकांना या सिनेमातून सुनील पाल यांचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे. एक निर्धार हा सिनेमा सामाजिक विषयावर आधारित आहे. समाजातील घडामोडींवर या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे.या सिनेमात खुद्द सुनील पाल भूमिका तर साकारणार आहेत. याशिवाय सिनेमात सुनील पाल यांच्यासह प्रेमा किरण, मुश्ताक खान आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
फॅमिली 420 हा सिनेमाही सुनील पाल रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. हा सिनेमात एक कॉमेडी सिनेमा असणार आहे. त्यामुळं साहजिकच यांत कॉमेडी कलाकार पाहायला मिळणार आहेत. सुनील पाल यांच्यासह यांत ज्येष्ठ विनोदी अभिनेता असरानी,उपासना सिंह,विजय चव्हाण आणि विजय कदम अशी तगडी कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.सुनील पालच्या तिस-या सिनेमाचं नाव 'एक होता लेखक' असं असेल.शीर्षकावरुनच हा सिनेमा एका लेखकाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं समजतंय. त्यामुळे हा एक बायोपिक सिनेमा असणार आहे.या बायोपिकमधून लेखकाच्या कुंचबनेवर भाष्य करण्यात आलं आहे.हे तिन्ही मराठी सिनेमे याच वर्षी रसिकांच्या भेटीला येणार असल्याचे सुनील पालने सांगितले आहे. त्यामुळे येत्या वर्षात हसून हसून लोटपोट होण्यासाठी आणि चांगल्या कलाकृती पाहण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन सुनील पालने रसिकांना केलंय. 

Web Title: Comedian Sunil Pal will give Marathi cinematic treat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.