दोन खलनायक एकत्रित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 12:30 IST2017-02-28T07:00:50+5:302017-02-28T12:30:50+5:30
काहे दिया परदेस या मालिकेमधून विकी म्हणजेच निखिल राउत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याची ही भूमिका आज ही ...
.jpg)
दोन खलनायक एकत्रित?
क हे दिया परदेस या मालिकेमधून विकी म्हणजेच निखिल राउत याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याची ही भूमिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. त्याचप्रमाणे स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेच्या माध्यमातून अनविताची भूमिका साकारलेली माधवी निमकरदेखील आज ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कलाकार त्यांच्या या लोकप्रिय मालिकेत खलनायकांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या या भूमिकेची खासियत म्हणजे, हे दोन्ही कलाकारांनी खलनायकांच्या भूमिकेत ही प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन्ही खलनायक लवकरच प्रेक्षकांना एका प्रोजेक्टच्या माध्यमातून एकत्रित दिसणार असल्याचे समजत आहे. हे ऐकून नक्कीच तूमची तू तू मैं मै झाली असणार. मात्र घाबरू नका. हे दोन खलनायक आता एका रोमँण्टिक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे सूत्रांकडून कळत आहे. आता निखिल आणि माधवी आपल्या खलनायकांच्या भूमिकेतून बाहेर पडून एक हटक्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यांची ही रोमँण्टिक जोडी आता प्रेक्षकांच्या मन जिंकण्यास सज्ज झाली आहे. मात्र ही जोडी नक्की चित्रपट, मालिका किवा नाटकांच्या माध्यमातून पाहायला मिळणार का यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की. निखिलने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. त्याची तू तिथे मी या मालिकेतील खलनायकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर माधवीनेदेखील यापूर्वी जावई विकत घेणे, अवघाची संसार या मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.