बालेवाडीच्या स्टेडियममध्ये सिनेमाचं शुटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 16:13 IST2017-05-26T10:43:36+5:302017-05-26T16:13:36+5:30

मराठी सिनेमात नवनवीन प्रयोग होत आहेत. नवे विषय सिनेमाच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. विनोदी, कौटुंबिक सिनेमांपेक्षा काही तरी वेगळा ...

Cinema shooting at Balewadi stadium | बालेवाडीच्या स्टेडियममध्ये सिनेमाचं शुटिंग

बालेवाडीच्या स्टेडियममध्ये सिनेमाचं शुटिंग

ाठी सिनेमात नवनवीन प्रयोग होत आहेत. नवे विषय सिनेमाच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. विनोदी, कौटुंबिक सिनेमांपेक्षा काही तरी वेगळा आशय असलेले सिनेमाही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत. आता असाच काहीसा प्रयोग दिग्दर्शक मिलिंद शिंदे करत आहेत. लवकरच ते मराठीत एका खेळावर आधारित सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. अॅथलेटिक्सवर आधारित हा सिनेमा असेल. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणा-या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करुन तो त्यांना राष्ट्रीय पातळीवर कसं नेतो याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. ब-याच काळानंतर खेळासारखा विषय मराठी सिनेमातून हाताळला आहे. सिनेमाचा विषय पाहता त्याचं शुटिंग पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या शेड्यूलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यात आलं. या निमित्तानं स्टेडियममध्ये स्पर्धेसारखीच लगबग पाहायला मिळाली. राष्ट्रीय स्पर्धेच्या शुटिंगसाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज होती. राज्यात नाशिक, रत्नागिरी आणि पुणे याच ठिकाणी ही सुविधा आहे. नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन शुटिंग करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता शुटिंगसाठी महत्त्वाची असल्याने हाच पर्याय निवडल्याचं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी सांगितलं आहे. विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं हे स्टेडियम आता सिनेमांसाठीही वापरलं जाऊ लागलं. याआधी हिंदीत सुपरहिट ठरलेल्या दंगल सिनेमाचं शुटिंगही बालेवाडीतल्या स्टेडियममध्ये झालं होतं. मात्र मिलिंद शिंदे यांच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच बालेवाडीत शूटिंग पार पडलं आहे. या सिनेमाची निर्मिती मोशन पिक्चर्सनं केली आहे. किरण बेरड यांनी या सिनेमाचं लेखन केलं आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरलं नसलं तरी मिलिंद शिंदे यांचा हा वेगळा प्रयोग रसिकांना नक्कीच भावेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: Cinema shooting at Balewadi stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.