CID फेम दया लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर; 'या' मराठी चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:08 PM2022-03-09T16:08:00+5:302022-03-09T16:08:39+5:30

Dayanand shetty:दरवाजा तोडण्याच्या स्टाइलमुळे दयानंद खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले. मात्र, या मालिकेनंतर त्याचा कलाविश्वातील वावरही कमी झाला.

cid daya actor dayanand shetty will debut in marathi film garam kitly | CID फेम दया लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर; 'या' मराठी चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

CID फेम दया लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर; 'या' मराठी चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

गेली कित्येक वर्ष CID या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही मालिका संपूनही बराच काळ झाला. मात्र, त्यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे दयानंद शेट्टी. या मालिकेत दयानंद यांनी दया ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे दरवाजा तोडण्याच्या स्टाइलमुळे दयानंद खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाले. मात्र, या मालिकेनंतर त्याचा कलाविश्वातील वावरही कमी झाला. मात्र, आता लवकरच ते एका मराठी चित्रपटात झळकणार आहेत.

दयानंद हे लवकरच एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगली आहे.  'गरम किटली' असं त्यांच्या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ते महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
सध्या या चित्रपटात दयानंद कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे. मात्र, त्याच्यासोबत दिग्दज कलाकार झळकणार आहेत. यात विजय पाटकर, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, विशाखा सुभेदार, मनीषा पैठणकर, विराज गोडकर, पल्लवी पाटील आदी कलाकार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटअंतर्गत करण्यात येत आहे. तर, दिग्दर्शन राज पैठणकर करत आहेत. अलिकडेच या चित्रपटाचा मुर्हूत संपन्न झाला असून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.दयानंद यांनी आजवर बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यासोबतच थिएटर आर्टिस्ट म्हणून पुरस्कारही जिंकले आहेत. तुळू भाषेतील 'सिक्रेट' या नाटकातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १९९८ मध्ये 'सीआयडी' मालिकेत मिळालेली सीआयडी ऑफिसरची भूमिका दयाच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. 
 

Web Title: cid daya actor dayanand shetty will debut in marathi film garam kitly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.