'चिरंजीव'चे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:27 IST2016-01-16T01:06:48+5:302016-02-10T08:27:53+5:30

काळानुरूप पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी-परंपरा या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या जगात बदलत आहेत. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये असलेला ताण, अलिप्तपणा सांधताना ...

'Chiranjeeo' poster release | 'चिरंजीव'चे पोस्टर रिलीज

'चिरंजीव'चे पोस्टर रिलीज

ळानुरूप पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी-परंपरा या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या जगात बदलत आहेत. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये असलेला ताण, अलिप्तपणा सांधताना बर्‍याचदा पाहायला मिळतो. अशाच काही अंधश्रद्धा, रूढी-परंपरा अशा गोष्टींवर भाष्य करणारा एक चित्रपट येत आहे 'चिरंजीव'. हुशार आणि नानाविध भूमिका साकारणारा अभिनेता भरत जाधव यामध्ये प्रमुख भूमिका साकारत असून त्यांच्यासोबत भार्गवी चिरमुले, किशोर कदम, प्रसाद ओक आणि अलका कुबल महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. नेहमी साध्या किंवा नेहमीच्या भूमिकांमध्ये दिसणारा भरत जाधव या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे यांनी केले असून, मुंबई सिने इंटरनॅशनल्समवेत कार्निव्हल मोशन पिक्चर्स चित्रपटाची निर्मिती करीत आहेत.

Web Title: 'Chiranjeeo' poster release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.