लग्नानंतर चिराग पाटील करणार लव बेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 11:51 IST2017-01-19T11:48:37+5:302017-01-19T11:51:07+5:30

लग्नानंतर आता, चिराग पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता चिराग पाटील याच्या लव बेटिंग ...

Chirag Patil will love love betting after the wedding | लग्नानंतर चिराग पाटील करणार लव बेटिंग

लग्नानंतर चिराग पाटील करणार लव बेटिंग

्नानंतर आता, चिराग पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता चिराग पाटील याच्या लव बेटिंग या आगामी चित्रपटाचा नुकताच मुहुर्त पार पडला. कारण या चित्रपटाचे चित्रिकरणदेखील सुरू झाले आहे.  राजू मेश्राम दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात काजल शर्मा, सयाजी शिंदे, अनंत जोग, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, कमलेश सावंत, वैभव मांगले, अनिकेत केळकर अशा तगडया कलाकारांचा समावेश असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून चिराग पाटील आणि स्मिता गोंदकर पहिल्यांदाच एकत्रित येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना लवकरच एक हटके जोडी पाहायला मिळणार आहे. प्रेम या संवेदनशील विषयातील चढ-उतार, रेखाटणारी कथा असणारा हा चित्रपट आहे.  या चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली आहे. तर कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित काही गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. लव बेटिंग  चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करणार असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. यापूर्वी चिराग पाटील हा वजनदार या चित्रपटात पाहायला मिळाला होता. या चित्रपटात चिरागसोबत सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर दिसले होते. सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा चित्रपट होता. तसेच हा चित्रपट मोठया प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. चला आता पाहूयात चिरागचा लव बेटिंग हा चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरतो का?

Web Title: Chirag Patil will love love betting after the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.