हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग पाटील आणि काजल शर्माची 'लव बेटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 16:23 IST2017-02-16T09:30:35+5:302017-02-16T16:23:50+5:30

कित्येक वर्षापासून जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलिवूडही अपवाद राहिलेलं नाहीय. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, ...

Chirag Patil and Kajal Sharma's 'Love Betting' in Himalayas | हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग पाटील आणि काजल शर्माची 'लव बेटिंग'

हिमालयाच्या कुशीत रंगली चिराग पाटील आणि काजल शर्माची 'लव बेटिंग'

त्येक वर्षापासून जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय.याला बॉलिवूडही अपवाद राहिलेलं नाहीय. स्विस एल्पस, टाइम्स स्केअर, आयफेल टॉवर, पिरॅमिड, सिडनी हार्बर, स्टॅच्यु ऑफ लिबर्टी अशा अनेक जगप्रसिद्ध वास्तूंचं दर्शन रसिकांना बॉलिवुडच्या सिनेमातून घडलंय.आता मराठी सिनेमाही फक्त केथेलाच महत्त्व न देता लोकेशन्सवरही विशेष मेहनत घेताना दिसतायेत. गेल्या काही वर्षांपासून आता मराठी सिनेमातही कथेप्रमाणेच आकर्षक लोकेशन्सचे दर्शन सिनेमातून घडतंय. तुटपुंज बजेट हे गेल्या वर्षापासून मराठी सिनेमांसाठी मोठं दुखणं ठरत होतं. आकर्षक लोकेशन्स, बिग बजेट यांचा मराठी सिनेमांशी फार अभावानं संबंध दिसून यायचा. मात्र आता काळ बदललाय आणि मराठी सिनेमांमध्ये दिसणारी लोकेशन्ससुद्धा बदललीत. कधी काळी ग्रामीण भागासह मुंबई आणि पुण्यात शूट होणारे मराठी सिनेमा आता परदेशातील आकर्षक लोकेशन्सवर शूट होऊ लागलेत. बजेट वाढल्याने मराठी सिनेमांमध्ये आता कधीही न पाहिलेली परदेशातली ठिकाणं दिसू लागलीत. आगामी लव बेटींग सिनेमातही आकर्षक लोकेशन्सचे दर्शन रसिकांना घडणार आहे. हिमालयाच्या कुशीतील निसर्गसौंदर्यही ‘एस. एन.फिल्मस एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत आगामी ‘लव बेटिंग’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चिराग पाटील आणि काजल शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लव बेटिंग’ या सिनेमाच्या एका रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण हिमालयाच्या कुशीतील कुलू मनाली, सोलांग व्हॅली यासारख्या निसर्गरम्य ठिकाणीशूटिंग करण्यात आले. ‘कधी कसे खुळे मन गुंतले, सारेच वाटे मग मज सोबती’ असे बोल असलेल हे गीत काजल शर्मा व चिराग पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. बर्फात लपेटून केलेली मौज मस्ती या संपूर्ण युनिटसाठी एक सुखद अनुभव होता. आपल्या या शूटिंगच्या अनुभवाबद्दल बोलताना काजल व चिराग सांगतात की, प्रेमात पाडणाऱ्या सुंदर अशा लोकेशन्सवर आम्ही ‘फुल्ल टू धमाल’ केली. हिमालयाच्या कुशीतल्या हसीन वादीयाँ मधून आम्हला यावसचं वाटत नव्हंत.
‘लव बेटिंग’ या चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू मेश्राम याचं आहे. ‘प्रेम’ या संवेदनशील विषयातील चढ-उतार, या सिनेमात पहायला मिळतील. चित्रपटाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. ‘लव बेटिंग’ चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करीत असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.    

Web Title: Chirag Patil and Kajal Sharma's 'Love Betting' in Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.