गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:22 IST2025-01-16T15:21:08+5:302025-01-16T15:22:08+5:30
Sangeet Manapaman Movie : सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत 'संगीत मानापमान' चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात 'संगीत मानापमान' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं भव्य आयोजन केले होते.

गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं 'संगीत मानापमान'च्या स्क्रीनिंगचं आयोजन
सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित आणि अभिनीत 'संगीत मानापमान' (Sangeet Manapman Movie) चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी गोव्यात 'संगीत मानापमान' चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं भव्य आयोजन केले होते. या स्क्रीनिंगसाठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, शैलेश दातार, सुनील फडतरे आणि सुबोध भावे ह्यांची पत्नी मंजिरी भावे उपस्थित होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'संगीत मानापमान' चित्रपटाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले की, "चित्रपट बघून खूप छान वाटलं, सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा."
Delighted to attend & watch Marathi movie 'Sangeet Manapman' Directed & Acted by @subodhbhave09 along with Producer Shri Sudhir Phadta Re, actors Shri Sumeet Raghvan, Shri Shailesh Datar, Vaidehi Parshurami and others at the special screening at @esg_goa.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 15, 2025
The movie is inspired… pic.twitter.com/cKEeZZGDnR
'संगीत मानापमान' या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. संगीत प्रेमींसोबत लहान मुलेसुद्धा या सिनेमाचा आनंद लुटत आहेत. अप्रतिम चित्रीकरण आणि एक से बढकर एक गाणी असा हा संगीतमय चित्रपट 'संगीत मानापमान' १० जानेवारी पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य ही करतोय.