​मुख्यमंत्रींच्या हस्ते ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2016 13:12 IST2016-05-29T07:42:23+5:302016-05-29T13:12:23+5:30

थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मोठ्या उत्साहात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

The Chief of the Chief Minister concluded with the theme of 'Satyashodhak' | ​मुख्यमंत्रींच्या हस्ते ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

​मुख्यमंत्रींच्या हस्ते ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

र समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त मोठ्या उत्साहात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, आमदार नीलम गोºहे, विधानपरिषद सचिव युके चव्हाण, प्रधान सचिव  अनंत कळसे या मान्यवरांसह अभिनेता संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश रावसाहेब जळमकर व संगीतकार अमितराज उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी, वैयक्तिक आयुष्यासोबत सामाजिक जीवनातही अतिशय खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीवर यशस्वीपणे मात करणाºया जोतिबांचा जीवनपट प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे सांगत शुभेच्छांचा वर्षाव केला.

समता फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या ‘सत्यशोधक’ चित्रपटातून महात्मा जोतिबा फुलेंचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांची भूमिका चतुरस्त्र अभिनेते संदीप कुलकर्णी साकारत असून चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर यांनी केलं आहे. तर संगीत अमितराज यांचं आहे.

३ जून पासून सत्यशोधकच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात होणार आहे.

Web Title: The Chief of the Chief Minister concluded with the theme of 'Satyashodhak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.