आईवर इतकं प्रेम! छाया कदम यांनी बनवली आईची प्रतिकृती, होतोय कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:12 IST2025-10-30T17:11:52+5:302025-10-30T17:12:22+5:30
आईच्या आठवणीत छाया कदम यांनी त्यांची प्रतिकृती बनवून घेतली आहे. त्या प्रतिकृतीसोबत त्यांनी छान फोटोही काढले आहेत.

आईवर इतकं प्रेम! छाया कदम यांनी बनवली आईची प्रतिकृती, होतोय कौतुकाचा वर्षाव
छाया कदम हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव. अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर छाया कदम यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही गाजवली. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. छाया कदम यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्या सोशल मीडियावरुन चाहत्यांना अपडेट देत असतात. दिवाळीनिमित्त छाया कदम यांनी काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
छाया कदम यांनी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत. पण या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलंय ते अभिनेत्रीच्या आईने. आईच्या आठवणीत छाया कदम यांनी त्यांची प्रतिकृती बनवून घेतली आहे. त्या प्रतिकृतीसोबत त्यांनी छान फोटोही काढले आहेत. आईवरच्या प्रेमापोटी अभिनेत्रीने केलेली ही कृती चाहत्यांच्याही पसंतीस उतरली आहे. छाया कदम यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, छाया कदम यांना नुकतंच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. लापता लेडीजमधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला. छाया कदम यांनी 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर 'मडगाव एक्सप्रेस', 'लापता लेडीज', 'झुंड', 'गंगुबाई काठियावाडी' या बॉलिवूड सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.