हा प्रसिद्ध शेफ आहे सदाशिव अमरापूरकर यांचा जावई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 13:43 IST2019-11-08T13:38:46+5:302019-11-08T13:43:01+5:30
सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. त्यांना तीन मुली असून त्यांची नावे केतकी, सायली आणि रिमा अशी आहेत.

हा प्रसिद्ध शेफ आहे सदाशिव अमरापूरकर यांचा जावई
सदाशिव अमरापूरकर यांनी एकेकाळी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते. त्यांनी अनेक चित्रपटात रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना चांगलाच भावला. सडक या चित्रपटातील त्यांची महाराणीची भूमिका प्रचंड गाजली होती. या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्यांनी त्यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सदाशिव अमरापूरकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षं राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सदाशिव अमरापूरकर यांनी अनेक वर्षं चित्रपटसृष्टीत काम केले असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहिती आहे.
सदाशिव अमरापूरकर यांच्याबद्दल आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. त्यांना तीन मुली असून त्यांची नावे केतकी, सायली आणि रिमा अशी आहेत. त्यांची मुलगी केतकीने नुकतेच झी मराठी वरील होम मिनिस्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाद्वारे केतकीचे पती कोण आहे हे सगळ्यांना कळले. शेफ देवव्रत जातेगावकर हे केतकीचे पती असून त्यांचे अरेंज मॅरेज झाले आहे.
'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातील विशेष भागात केतकी अमरापुरकर-जातेगावकर आणि शेफ देवव्रत जातेगावकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. पण त्याचसोबत त्यांनी सदाशिव अमरापुरकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही सारे खवय्ये या झी मराठी वरील प्रसिद्ध कार्यक्रमात प्रेक्षकांना शेफ देवव्रत जातेगावकर यांना पाहायला मिळते. केतकी आणि देवव्रत यांनी एक मुलगी असून तिचे नाव मीरा आहे.