‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, वन्समोअरचा शोर अन् कलाकार गोंधळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 18:07 IST2025-11-25T18:06:54+5:302025-11-25T18:07:25+5:30

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाच्या रविवारी (२३ डिसेंबर) ठाणे येथील पार पडलेल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली.

cheernjiv perfect bighadlay natak once more response from audience | ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, वन्समोअरचा शोर अन् कलाकार गोंधळले

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, वन्समोअरचा शोर अन् कलाकार गोंधळले

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या नाटकाच्या रविवारी (२३ डिसेंबर) ठाणे येथील पार पडलेल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली. दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही,  त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.

रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूममध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी त्या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’.

तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात.  आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.

Web Title : 'चिरंजीव परफेक्ट बिगडलाय' को दर्शकों की वाहवाही, कलाकारों को आश्चर्य!

Web Summary : 'चिरंजीव परफेक्ट बिगडलाय' के ठाणे प्रदर्शन को शानदार प्रतिक्रिया मिली। श्रेयस जोशी और वैभव रंधवे को वन्स मोर सुनकर आश्चर्य हुआ। दर्शकों ने ताज़ा कॉमेडी का आनंद लिया और कलाकारों को सफलता की शुभकामनाएं दीं, भविष्य में वन्स मोर स्वीकार करने के लिए प्रोत्साहित किया।

Web Title : Audience Cheers 'Chiranjeev Perfect Bighadlay', Actors Surprised by Encore!

Web Summary : Thane performance of 'Chiranjeev Perfect Bighadlay' received a great response. Actors Shreyas Joshi and Vaibhav Randhave were surprised by an encore. The audience enjoyed the fresh comedy and wished the cast success, encouraging them to accept future encores.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.