'कार्टी काळजात घुसली'ची सेंच्युरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:45 IST2016-01-16T01:13:58+5:302016-02-06T10:45:57+5:30
एकीकडे 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट यशस्वी घोडदौड करीत आहे आणि दुसरीकडे याच नावाचा आधार घेत बसवलेल्या 'कार्टी काळजात ...

'कार्टी काळजात घुसली'ची सेंच्युरी
ए ीकडे 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट यशस्वी घोडदौड करीत आहे आणि दुसरीकडे याच नावाचा आधार घेत बसवलेल्या 'कार्टी काळजात घुसली' या नाटकाने नुकतीच सेंच्युरी मारली आहे. वडील-मुलगी यांच्या खट्टय़ा-मिठय़ा नात्यावर या नाटकाची कथा आधारित आहे. प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. एप्रिलमध्ये हे नाटक रसिकांसमोर प्रथमच सादर करीत इतक्या कमी वेळांत या नाटकाने सेंच्युरी मारलेली पाहता लवकरच हे नाटक ५00 चा टप्पाही पार करेल, हे काही वेगळं सांगायला नको.

