मराठी सिनेमांचे विषय दर्जेदार होत असुन आज नवनवीन चित्रपट, नवीन कथा आता येत आहेत आणि ...
कल्टी... सपनों से च्या चित्रीकरणाला सुरुवात
/> मराठी सिनेमांचे विषय दर्जेदार होत असुन आज नवनवीन चित्रपट, नवीन कथा आता येत आहेत आणि प्रेषकांचा त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एका नवीन मराठी चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. साईली ड्रिम व्हेंचर्स प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सुधा सावंत निर्मित कल्टी... सपनों से या मराठी चित्रपटाचा मुहूर्त सासवड येथे नुकताच संपन्न झाला. आता नावावरुनच काहीतरी इंटरेस्टींग सबजेक्ट असणार असे नक्कीच प्रेक्षकांना वाटत असेल. कल्टी... सपनों से या चित्रपटाची कथा किरण पोटे यांनी लिहिली असून याचे दिग्दर्शनदेखील त्यांनीच केले आहे. संतोष गावडे हे कॉस्च्युम डिझायनर आहेत तर सुमन साहू यांचं छायाचित्रण या चित्रपटाला लाभलं आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असले तरी पण अद्याप या चित्रपटातील कलाकार कोण या गोष्टीचा उलगडा करण्यात आलेला नाही. कलाकारांची नावे जरी गुलदस्त्यात असली तरी आपल्याला एक वेगळा विषय लवकरच पडद्यावर पहायला मिळणार यात मात्र शंका नाही. आता या चित्रपटात कोणते कलाकार त्यांच्या अभिनयाची मोहोर उमटविणार आहेत हे दखील आपल्याला लवकरच समजेल.
Web Title: Celtic ... The beginning of filming with dreams