पारंपारिक कोल्हापुरी मेजवानीला सेलिब्रिटींची मांदियाळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2018 15:41 IST2018-02-28T10:11:39+5:302018-02-28T15:41:39+5:30

खाद्यसंस्कृतीचा मोठा वारसा असलेल्या कोल्हापुरी जेवणाची. आजकाल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण सहज उपलब्ध होते, मग ते मालवणी असो वा ...

Celebrities of traditional Kolhapuri banquet! | पारंपारिक कोल्हापुरी मेजवानीला सेलिब्रिटींची मांदियाळी!

पारंपारिक कोल्हापुरी मेजवानीला सेलिब्रिटींची मांदियाळी!

द्यसंस्कृतीचा मोठा वारसा असलेल्या कोल्हापुरी जेवणाची. आजकाल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेवण सहज उपलब्ध होते, मग ते मालवणी असो वा कोल्हापुरी. परंतु त्या जेवणाची अस्सल चव  फारच कमी रेस्टाँरंटना टिकवता येते.मुंबईत राहून जर अशाच उत्तम कोल्हापुरी घरगुती  जेवणाची चव चाखायची असेल तर  त्यासाठी आपल्याला खुद्द कोल्हापुरात जाण्याची गरज नाही,त्यासाठी ठाण्यातलं प्रसिद्ध  "MH-०९ शेतकरी" हे एकच वन-स्टॉप-शॉप. मुंबईत अशी अनेक रेस्टोरंट उपलब्ध आहेत जिथे कोल्हापुरी जेवण सहज उपलब्ध होते. "MH-०९ शेतकरी" मध्ये तुम्हाला झटपट आणि अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद लुटता येईल, त्यांची USP  म्हणजे त्यांची High Quality ग्रेव्ही जी "शेतकरी"ला एक वेगळेपण देते. "कोल्हापूर म्हणजे 'शेतकरीच' खणखणीत नाणं, 'शेतकरीच्या' जेवणामुळे मुग्ध झालं ठाणं" असं म्हणत फक्त ठाणेकरांच्याच नाही, तर मुंबईतील अनेक खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरलेलं आहे. "MH-०९ शेतकरी" ह्यांचं "पिठलं-भाकरी", "मसाला वांग" हा असे वेगवेगळे स्पेशल मेनु प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे सामान्य खाद्यप्रेमींसोबतच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची  "MH-०९ शेतकरी" ला भेट  दिलेली आहे. दिग्दर्शक संजय जाधव,अभिनेता स्वप्नील जोशी,सोनिया-अतुल परचुरे ते अभिनेत्री तेजस्विनी पंडित पर्यंत सर्वच कलाकार आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी हे कलाकार "शेतकरी"कडे  धाव घेतात आणि तिथल्या जेवणाचा आनंद लुटतात. "MH-०९ शेतकरी" ठाण्यासोबतच कोल्हापुरातही तितकाच प्रसिद्ध आहे.



Also Read:​स्वप्निल जोशीचे NO.1 यारी विथ​ स्वप्निल या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन

स्वप्निलला आज मराठीतील सुपरस्टार असे संबोधले जाते. ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. सध्या तो ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. स्वप्निलने छोट्या पडद्यापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यामुळे छोटा पडदा हा त्याच्यासाठी नेहमीच खास आहे.त्याने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.तसेच अनेक रिअॅलिटी शो चा तो हिस्सा बनला आहे. स्वप्निलने गेल्या वर्षी कोण होईल मराठी करोडपती या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन केले होते. स्वप्निलचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमातील स्वप्निलच्या सूत्रसंचालनाचे चांगलेच कौतुक झाले होते. आता पुन्हा एकदा स्वप्निल छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. 




Web Title: Celebrities of traditional Kolhapuri banquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.