मराठी अभिनेत्रीने बेबी बंम्प फ्लॉन्ट करत केला धम्माल डान्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 14:25 IST2021-08-24T14:20:29+5:302021-08-24T14:25:49+5:30
सोशल मीडियावरही ती बराच सक्रीय असते. या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात ती असते. स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ ती शेअर करत असते. नु

मराठी अभिनेत्रीने बेबी बंम्प फ्लॉन्ट करत केला धम्माल डान्स, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
सेलिब्रेटी मंडळी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट चाहत्यांना जाणून घेण्यात चाहत्यांनाही रस असते. सतत शूटिंगमध्ये व्यस्त असणारे कलाकार थोडा वेळ मिळताच मजा मस्ती करत वेळ घालवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे चाहत्यांचे लक्ष त्याच्यावरच खिळले आहे. विशेष म्हणजे व्हिडीओत अभिनेत्री बेबी बंम्प फ्लॉन्ट करत डान्स करताना दिसत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे प्रिया बापट.
प्रिया बापटच्या शूटिंगदरम्यानचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावरही ती बराच सक्रीय असते. या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात ती असते. स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला एक हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा मजेशीर अंदाज पाहून चाहतेही भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच व्हिडीओमुळे प्रिया बापटची सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे.
प्रिया बापटची 'सिटी ऑफ ड्रिम्स' ही गाजलेली वेब सीरिज आहे. दुसर-या भागाने रसिकांची पसंती मिळवली. पूर्णिमा गायकवाड गृहिणीची भूमिका तिने साकारली होती.पूर्णिमा गायकवाड पात्रासोबत खूप जवळून संबंध आला. तिला जवळून ओळखता आले. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये ती काय प्रकारे विचार करत असेल, काय प्रकारे तिची देहबोली बदलेल हे समजले होते. प्रॅक्टिकली मी गोष्टीचा अनुभव घेतला आहे. कलाकार एखादी भूमिका साकारत असताना भावनिकरित्या कलाकार त्या त्या स्तरातून जात असतो. त्यामुळे ते पात्र दुसऱ्या सीझनमध्ये साकारायला खूप जास्त मजा आली.
मी पहिल्या सीझनमध्ये पूर्णिमा गायकवाड साकारताना माझ्या मनावर दडपण होते. तितकेच जास्त मी दुसऱ्या सीझनमध्ये एन्जॉय केल्याचे प्रिया बापटने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.वेब सीरिजमध्ये प्रिया बापटसोबतच सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी, देवस दीक्षित, विकास केणी, संदीप कुलकर्णी असे अनेक दिग्गज मराठी कलाकारांच्याही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या आहेत.