कॅडबरी या नाटकाचा १४ फेब्रुवारीला शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 18:03 IST2017-02-10T12:33:46+5:302017-02-10T18:03:46+5:30

 आजची तरुणाई इतकी फास्ट होत आहे. की टी.व्ही. वर चॅनेल बदलावेत तसे आजची मुले-मुली साथीदार बदलतात. या जागतिकीकरणात या ...

Cadbury launch on 14th February | कॅडबरी या नाटकाचा १४ फेब्रुवारीला शुभारंभ

कॅडबरी या नाटकाचा १४ फेब्रुवारीला शुभारंभ

 
जची तरुणाई इतकी फास्ट होत आहे. की टी.व्ही. वर चॅनेल बदलावेत तसे आजची मुले-मुली साथीदार बदलतात. या जागतिकीकरणात या तरुणाईंने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. पण आजही आधुनिक जगात जुन्या विचारांचे जोडपे आढळतात. यावरुन आपला देश नक्की प्रगत होतोय का याचा समतोल म्हणजे कॅडबरी.
   
           कॅडबरी या नाटकाची कथा आजच्या तरुण पिढीची साधारणत: १७ ते २५ वयोगटातील युवकांची, प्रेमाकडे बघण्याचा दृश्टीकोन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विरुध्द स्वभाव आणि तरुणाईच्या वाटेवर असलेली पिढी एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर काय-काय होते हे या नाटकातून दाखविण्याचा हेतू आहे. यातील पात्र आपल्या देशातील परिस्थितीची जाणीव करुन देतात. देश प्रगत होतोय असं म्हणतात, पण खरच देश म्हणजे आपण तितके प्रगत होतोय काय? हयावर आणि आजच्या तरुणाईवर भाष्य करणारे हे नाटक आम्ही सादर करीत आहोत. हया नाटकाची निर्मिती एम्स्मोशन  पिक्चर्स या संस्थेने केली आहे. पुण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातही ही नाटकांचे प्रयोग लावले जाणार आहेत.  पहिले बॉलीवूड स्टाईल मराठी नाटक म्हणून या नाटकाची सगळीकडे चर्चा आहे. या नाटकात ४० सीन्सचा सुरेख संगम आढळून येतो. म्युझिकली हया नाटकाला भक्कम करण्यावर विषेश भर दिला गेला आहे.

           नवोदित कलकारांच्या सहाय्याने एक वेगळं नाटक एम्स्मोशन न पिक्चर्स रसिकांसमोर घेऊन येत आहे. बाँलीवुड स्टाईल मराठी नाटक कॅडबरीचा शुभारंभ १४ फेब्रुवारी ला पुण्यात होणार आहे. या  नाटकामध्ये अपूर्वा संन्यासी, सागर मलठणकर, रचना काकडे, अमोल काळे  हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर सहकलाकार म्हणून महेष कुलकर्णी, मयुरेष ठाकूर, मधूरा टापरे, अपुर्वा शिंदे अक्षय बाणखेले, क्षितीज नाचणकर, सृश्टी मिसाळ यांचा समावेश आहे. या नाटकाचे निमार्ते पुर्णेष मुळे, लेखक व दिग्दर्षक ओंकार मारुलकर, व संगीत दिग्दर्षक प्रतिक नाईक यांचे आहे. तसेच या नाटकासाठी ध्वनी संकलन आणि संगीत ओंकार प्रधान आणि प्रशांत  भारंभे यांनी दिले आहे.








Web Title: Cadbury launch on 14th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.