भाऊ करणार हरीची वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 18:12 IST2016-07-02T12:42:11+5:302016-07-02T18:12:11+5:30

  Exclusive - बेनझीर जमादार आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोटभरून हसायला लावणारा सर्वाचा लाडका अभिनेता भाऊ कदम व कुशल बद्रिके हे ...

Brother Harry wary | भाऊ करणार हरीची वारी

भाऊ करणार हरीची वारी

  
Exclusive - बेनझीर जमादार

आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना पोटभरून हसायला लावणारा सर्वाचा लाडका अभिनेता भाऊ कदम व कुशल बद्रिके हे दोन कलाकार हरीची वारी या आगामी चित्रपटात एकत्रित झळकणार असल्याचे भाऊनी लोकमत सीएनएक्सला सांगितले. भाऊ म्हणाले, सासवड येतील दिवे घाटामध्ये नुकतेच या चित्रपटाचे शुटिंग झाले आहे. प्रत्यक्ष लोकेशनवर येऊन या वारीसोबत चित्रिकरण केले आहे. तसेच टप्प्या टप्पयाने  पंढरपूरपर्यत चित्रपटाचे लोकेशन देखील आहे. पंढरपूर येथील प्रत्यक्ष लोकेशनवर जाऊन देखील चित्रपटाचे शुटिंग करणार आहोत. तसेच प्रत्येक वारकरी हा वारीत येण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालवितो पण आम्हाला प्रत्यक्ष चित्रपटाच्या शुटिंगच्या माध्यमातून पंढरीची वारी करण्यास मिळाली हे आमचे भाग्य आहे. 

Web Title: Brother Harry wary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.