बॉक्स ऑफिसवर 'फुगे' सिनेमाने केली शानदार कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 11:50 IST2017-02-16T06:20:08+5:302017-02-16T11:50:08+5:30
मित्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी ...
बॉक्स ऑफिसवर 'फुगे' सिनेमाने केली शानदार कमाई
म त्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी असलेल्या मित्रांची केमिस्ट्री रूपेरी पडद्यावर रसिकांना भावली.त्यामुळे 'फुगे' सिनेमालाही रसिकांनी तुफान प्रतिसाद देत 'फुगे' सिनेमाला हिट सिनेमाच्या यादीत नेवून ठेवले आहे. सामाजिक आणि वैचारिक चित्रपटांमध्ये अडकून न राहता हलक्याफुलक्या विनोदीपटातून रसिकांचे ते मनोरंजन् करतोय. आतापर्यत गंभीर, ऐतिहासिक तसेच एखादे सिनेमा दाखवण्यात हातखंडा असणा-या मराठी इंडस्ट्रीत आता 'फुगे' सारख्या खुसखुशीत आणि फुल टाइम पास असणा-या सिनेमाने चांगलीच बाजी मारली आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठीच्या दोन सुपरस्टार्सन एकत्र आणणाऱ्या 'फुगे' या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाचे आनंदाचे फुगे उडवले आहेत. खरे पहिले तर, चाकोरीबद्ध असलेली प्रेमाची व्याख्या आधुनिक करण्याचा प्रयत्न या सिनेमातून झालेला दिसून येतो. खास करून बॅचलर तरुणाईसाठी हा सिनेमा मनोरंजनाची पर्वणी आहे, असे असले तरी सिनेमागृहात संपूर्ण कुटुंब हा सिनेमा पाहू शकतात असा हा कम्प्लीट फॅमिली इंटरटेनिंग सिनेमा आहे. प्रेम, मैत्री आणि धम्माल दाखवणाऱ्या या सिनेमाला 'फुगे' या सिनेमाच्या नावामुळेच अधिक प्रसिद्धी मिळत आहे.
आतापर्यंत वैचारिक आणि गंभीर चित्रपटाचे विषय आणि कथानक मराठी चित्रपटात सादर करण्यात आले होते, मात्र लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी गाजवलेला काळ तसेच त्यांच्या चित्रपटांचा साचा आजच्या सिनेमात पाहायला मिळत नाही. 'बनवाबनवी', 'धुमधडाका', 'फेकाफेकी' सारख्या मित्रांच्या धम्माल विनोदी सिनेमांची रेलचेल मागील काही वर्षापासून मंदावली असल्याचे दिसून येते, त्यामुळेच 'फुगे' हा सिनेमा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक मैत्रीच्या विश्वात रमताना दिसतोय. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा दर्जेदार मनोरंजनाची मेजवाणी ठरत आहे.दोन जिवलग मित्रांच्या नात्याकडे त्यांचे कुटुंबिय संशयाने पाहतात, दोघांपैकी एकाच्या आयुष्यात मुलगी आल्यामुळे त्यांच्या मैत्रीचे पुढे काय होते? असे बरेच काही या सिनेमात पाहायला मिळते. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या सिनेमात रोमान्स बरोबर ब्रोमान्स देखील पाहायला मिळत असल्यामुळे, प्रेक्षकांना हा ब्रोमान्स आवडत आहे. तसेच प्रार्थना बेहेरे, नीथा शेट्टी या अभिनेत्रींमुळे 'फुगे' सिनेमाला ग्लॅमरसपणाही मिळाला. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या चार दिवसांमध्ये ३ करोड ९६५ रुपयांचा गल्ला कमावला आहे. त्यामुळे हा सिनेमा ख-या अर्थाने प्रसिद्धीचे 'फुगे' उंच उडवण्यात यशस्वी झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
फुगे सिनेमाचे कलेक्शन खालीलप्रमाणे :-
शुक्रवार- रूपेरी पडद्यावर एंट्री मारताच या सिनेमाने - ८७.५ लाख रू.चा गल्ला जमवला.
तर दुस-या दिवशी शनिवारी या संख्तेत विक्रमी वाढ झाल्याचे दिसले तब्बल - १.१२ करोड रू. गल्ला जमवला.
रसिकांना फुल ऑन एंटरटेन करत असल्यामुळे रसिक आपसूकच फुगे सिनेमा पहाण्यासाठी सिनेमागृहाकडे वळताना दिसले.रविवार- १.३२ कोटींची कमाई सिनेमा केली.
तर सोमवार - ६३.५ लाख इतकी कमाई फुगे सिनेमाने केली. त्यामुळे या आकेडवारीनुसार रसिकांसाठी फुगे सिनेमा यंदाच्या आठवड्यात एक मनोरंजनाची पर्वणीच देणारा ठरला.
Also Read:fugay review : हवेत उंच उडणारे फुगे विषयी आणखी काही