लघुपटानंतर आता बॉलिवूड चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 11:10 IST2016-11-21T10:55:26+5:302016-11-21T11:10:59+5:30
मराठी चित्रपटसृष्टील अनेक कलाकारांची पाऊले बॉलिवूडकडे पडायला लागली आहेत. मात्र यापूर्वीदेखील अनेक मराठी कलाकार आहेत की, ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ...

लघुपटानंतर आता बॉलिवूड चित्रपट
म ाठी चित्रपटसृष्टील अनेक कलाकारांची पाऊले बॉलिवूडकडे पडायला लागली आहेत. मात्र यापूर्वीदेखील अनेक मराठी कलाकार आहेत की, ज्यांनी बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. त्यापैकीच एक अभिनेता अतूल कुलकर्णी. या कलाकाराने हे राम या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाची जादू दाखविली आहे. त्याचप्रमाणे नुकताच त्याचा आझाद हा हिंदी लघुपटदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या लघुपटात त्याच्यासोबत अभिनेत्री साक्षी तन्वर प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता अतूल हा हिंदी लघुपटानंतर बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव आसरा असे आहे. मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहणाºया झोपडपट्टीधारकांच्या जगण्यावर हा चित्रपट भाष्य करतो. थोडक्यात,या चित्रपटाची कथा त्यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला 'आसरा' हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रघुवीर यादव, अशोक समर्थ, सुनील पाल, ओंकारदास माणिकपुरी असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहे. 'पद्माविजन' या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सदानंद शेट्टी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच चित्रपटाची कथा एम. के. शंकर यांनी लिहिली आहे. पटकथा आणि दिग्दर्शन राज सागर यांचं आहे. तर संवादलेखन विशुद्ध आनंद शर्मा यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन अबधेश गोस्वामी यांनी केलं असून, रघुवीर यादव, सिद्धार्थ महादेवन, अभिजीत कोसम्बी व अबधेश गोस्वामी यांनी गाणी गायली आहे. यापूर्वी अतूल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नटरंग, हॅपी जर्नी, पोपट, राजवाडे अॅण्ड सन्स असे अनेक चित्रपट त्यांनी केले आहेत.