' चौकट राजा' सिनेमात दिलीप प्रभावळकर नाही तर 'हा' बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 20:27 IST2021-08-05T20:20:39+5:302021-08-05T20:27:43+5:30
चौकट राजा सिनेमात दिलीप प्रभाळकर यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या पतीची भूमिका होती आणि ‘नंदू’ची भूमिका रसिकांना प्रचंड भावली होती.

' चौकट राजा' सिनेमात दिलीप प्रभावळकर नाही तर 'हा' बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता होता दिग्दर्शकाची पहिली पसंती
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर वयाच्या ७७ वर्षीही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह कोणालाही थक्क करेल असाच असतो. आजही आपल्या अभिनयाने दिलीप प्रभावळकर रसिकांचे मनोरंजन करत आहेत. दिलीप प्रभावळकर यांचा गाजलेला ‘चौकट राजा’ हा सिनेमा आजही रसिकांच्या आठवणीत आहे. इतके वर्ष झाले तरी सिनेमाची जादू आजही कायम आहे. याच सिनेमाचा एक किस्सा समोर आला आहे.
चौकट राजा सिनेमात दिलीप प्रभाळकर यांनी दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या पतीची भूमिका होती आणि ‘नंदू’ची भूमिका रसिकांना प्रचंड भावली होती. मात्र या भूमिकेसाठी सुरुवातीला दिलीप प्रभावळकर पहिली पसंती नव्हते. दिलीप प्रभावळकर यांच्या आधी अभिनेता परेश रावल यांना ही भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. पण काही कारणांमुळे परेश रावल यांनी नकार दिला ऐनवेळी दिलीप प्रभावळकर यांना ती भूमिका देण्यात आली.
दिलीप प्रभावळकर यांनीही भूमिका अशी काय साकारली की, सिनेमातल्या त्यांचा अभिनयाने रसिकही थक्क झाले होते. इतकेच काय तर दिलीप प्रभावळकांनी 'झपाटलेल्या' या सिनेमात तात्या विंचूची भूमिका अशी काय साकारली होती की,ऑनस्क्रीन त्यांचा हा अंदाज पाहून सर्वच स्थरांतून त्यांचे कौतुक झाले होते. सिनेमातली भूमिका छोटी असली तरी आवाज सगळ्यांनाच भावला होता.
दिलीप प्रभावळकर अभिनयात येण्यापूर्वी टीसीएफ औषध निर्माती कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. नोकरी करता करता त्याच काळात ते बालरंगभूमीशी जोडले गेले आणि बघता बघता दिलीप प्रभावळकर अभिनेते म्हणून नावारूपाला आले.
ऑनस्क्रीन साकारलेल्या भूमिकांपेक्षा दिलिप प्रभावळकर ख-या आयुष्यात फार वेगळे आहेत. जितके ते ऑनस्क्रीन उग्र, रागीट व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका केल्या असल्या तरीही माझा स्वभाव नरमच राहिला, अतिशय सौम्य स्वभाव असल्याचे खुद्द दिलीप प्रभावळकर यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते.