'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, याबद्दल अभिनेत्री प्रणाली भालेराव म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 07:00 IST2020-07-25T07:00:00+5:302020-07-25T07:00:02+5:30
'टकाटक' मराठी चित्रपट बोल्ड सीन्समुळे खूप चर्चेत आला होता.

'टकाटक'मधील या बोल्ड गाण्याने तोडलेत सगळे रेकॉर्ड, याबद्दल अभिनेत्री प्रणाली भालेराव म्हणाली...
मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला खूपच कमी वेळ बोल्ड सीन पाहायला मिळतात. पण मागील वर्षी एका चित्रपटात आतापर्यंतच्या सगळ्याच चित्रपटांना मागे टाकत अतिशय बोल्ड सीन चित्रपटात दाखवले होते. या चित्रपटातील एका गाण्याची तर चांगलीच चर्चा रंगली होती. ‘येडयांची जत्रा’, ‘4 इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’ आणि ‘1234’ असे मनोरंजक चित्रपट बनवत प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी टकाटक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आणला होता.
टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं 'ये चंद्राला' हे रोमँटिक सॉंग पाहायला मिळाले होते. या गाण्यातील प्रणालीचा हॉट अंदाज आणि तिच्या मादक अदा यांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. मात्र बोल्ड विषय असल्यामुळे चित्रपट रिलीज व्हायच्याआधी नेगेटिव्ह कमेंट्स येत होत्या, असे प्रणाली भालेरावने सांगितले.
या गाण्याबद्दल प्रणाली म्हणाली की, मराठी सिनेसृष्टीमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण एवढे बोल्ड सीन्स असलेलं गाणं पहिल्यांदाच एका मराठी सिनेमा मध्ये दाखवण्यात आलं होत. श्रुती राणे हिने हे गाणं फार सुंदर गायलेलं आहे. १७ मिलिअन लोकांनी हे गाणं बघितलं आहे.
बोल्ड सीन्स असल्यामुळे माझ्याही मनात थोडी भीती होती. पण गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माझी भीती पळून गेली. अनपेक्षित प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळाला. भरपूर लोकांनी मला फोन, मेसेज करून गाणं छान असल्याचं कळवलं.
पुन्हा एकदा या भन्नाट चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी झी टॉकीजवर २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता 'टकाटक' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करणार आहे. त्यामुळे आपला रविवार 'टकाटक' बनवण्यासाठी पाहायला विसरू नका झी टॉकीज.