'काला चष्मा'ची प्रिया मराठेवर मोहिनी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:28 IST2017-05-17T06:58:55+5:302017-05-17T12:28:55+5:30
सध्याची गाणी रिलीज होताच लोकप्रिय ठरतात. या गाण्याची काही काळ रसिकांवर जादू पाहायला मिळते. मात्र कालांतराने ही गाणी रसिक ...

'काला चष्मा'ची प्रिया मराठेवर मोहिनी !
स ्याची गाणी रिलीज होताच लोकप्रिय ठरतात. या गाण्याची काही काळ रसिकांवर जादू पाहायला मिळते. मात्र कालांतराने ही गाणी रसिक विसरुन जातात. सध्याची गाणी तात्पुरती हिट होऊन विस्मृतीत जात असल्याचेही ऐकायला मिळतं. ब-याचदा सुपरहिट गाणी सांगताना जुन्या जमान्यातील गाणी किंवा नव्वदीच्या दशकातील गाण्यांचा दाखला दिला जातो. मात्र अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर चित्रीत करण्यात ''काला चष्मा'' हे गाणं अपवाद ठरलं आहे. बार बार देखो या सिनेमातील काला चष्मा हे गाणं बरंच हिट ठरलं होतं. आजही या गाण्याची जादू काही कमी झालेली नाही. रॅपर आणि गायक बादशाहनं या गाण्याला वेगळा टच दिला होता. अमर अर्शी, नेहा कक्कड आणि खुद्द बादशाहने हे गाणं गायलं होतं. चार्टबस्टरवर हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. वर्षभरानंतरही या गाण्याची जादू कायम असल्याचे समोर आलं आहे. अभिनेत्री प्रिया मराठे आणि तिच्या कुटुंबीयांवर काला चष्मा गाण्यानं मोहिनी घातली आहे. हे गाणं प्रियाला प्रचंड भावलं आहे. त्यामुळेच तिच्या आग्रहाखातर तिच्या कुटुंबातील महिलांनी काळा चष्मा घालून एक भन्नाट फोटो काढला. हा फोटो प्रियानं सोशल मीडियावर पोस्ट करुन फॅन्सना माहिती दिली.कुटुंबातील सगळ्यांना काला चष्मा गाण्याची लोकप्रियता पटवून दिली आणि काळा चष्मा परिधान करायला लावलाच. त्यानंतर रात्री दहा वाजता सगळ्या महिलांनी काळा चष्मा घालून फोटो क्लिक केला अशी पोस्ट प्रियानं केली आहे. प्रियानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर बराच लोकप्रिय ठरतो आहे. फॅन्सकडून या फोटोला विविध कमेंट्सही मिळत आहेत.