Birthday Special : मराठी चित्रपटसृष्टीत खणखणीत वाजणारं नाणं म्हणजे सतीश राजवाडे, वाचा त्यांचा प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 18:25 IST2018-01-09T12:53:39+5:302018-01-09T18:25:17+5:30
बहुतेकदा हिंदी सिनेमातील नायकांच्या उत्पन्नाचा स्तोत कळत नाही. पण त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांचा ताफा मात्र डोळ्यात भरण्यासारखा असतो. मराठीत हिंदी ...

Birthday Special : मराठी चित्रपटसृष्टीत खणखणीत वाजणारं नाणं म्हणजे सतीश राजवाडे, वाचा त्यांचा प्रवास!
>बहुतेकदा हिंदी सिनेमातील नायकांच्या उत्पन्नाचा स्तोत कळत नाही. पण त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांचा ताफा मात्र डोळ्यात भरण्यासारखा असतो. मराठीत हिंदी सिनेमासारखी श्रीमंती आणि ग्लॅमर फार दिसून येत नाही. ही चाकोरी मोडून काढण्याचं धाडस अभिनेता, लेखक, दिग्दर्शक असं अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या सतीश राजवाडे याने केले आणि ‘गैर’ घडला. टाईम बरा वाईट या चित्रपटातून आणि रुद्रम या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलमधून प्रेक्षकांनी पाहिलेल्या चेहºयामागे एक प्रतिभावान व्यक्तिमत्व लपलेलं आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजवर त्याने घडवलेल्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीवर एक प्रकाशझोत!
पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ ने महाराष्ट्रासह इतरही स्तरावर यश मिळवलेच, पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्याचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई २’ लग्नाला यायचंच नावाने आला आणि यशाची पुनरुक्ती झाली. या चित्रपटाचा तिसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाºया सतीश राजवाडे याने समर्थपणे पेलल्या. प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते हे प्रेमकथेवर बेतलेले व प्रेक्षकवर्गाला प्रचंड आवडलेले आणखी दोन चित्रपट. मृगजळ, एक नसलेले अस्तित्व, एक डाव धोबी पछाड, पोपट, बदाम राणी गुलाम चोर, गैर, सांगतो ऐका या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून त्याचं नाणं खणखणीत वाजलचं पण टाईम बरा वाईट या चित्रपटात आणि रुद्रम या टीव्ही सिरीयलमधून आपल्या उत्कृष्ट अभिनयाची चुणूकही त्याने दाखवून दिली.
असंभव, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे एक लग्नाची दुसरी गोष्टी या मालिकांचे प्रेक्षकवर्गातील वेड सर्वज्ञात आहेच. नेहमी तोच तो पणा न येऊ देता सतत काही तरी वेगळं आणि वेगळ्या प्रकारे मांडण्याची जिद्द त्याच्या आजवरच्या कलाकृतीतून दिसून आली आहे. आगामी चित्रपट ‘आपला मानूस’ विषयी बोलताना तो म्हणाला, प्रत्येकाला स्वत:चा वाटेल असा चित्रपट आहे. नाना पाटेकर, सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्याबरोबर काम करताना मजा आली. अजय देवगण सारखा निर्माता मिळाला. मी असंच प्रामाणिकपणे काम करत राहीन. तुम्हीही माझ्यामागे असेच उभे रहा. मला जे काही यश मिळालय त्याचं मोठे श्रेय तुम्हाला आहे असे आपल्या चाहते वर्गाला उद्देशून तो म्हणाला. माझ्या करिअरची सुरुवात बालनाट्यांपासून झाली आणि मृगजळ एक नसलेलं अस्तित्व मधून चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास सुरू झाला. ‘आॅल द बेस्ट’ हा थिएटरमधपा पहिला अनुभव होता. माझा आदर्श असलेले माझे आई-वडिल हे माझं प्रेरणास्थान आहेत. कष्ट करून आम्हाला भावंडांना त्यांनी लहानाचं मोठं केले आहे. तीच कष्ट करण्याची तयारी आणि कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीवर मात करून पुढे जाणं हे मी त्यांच्याकडून शिकलो आहे.
तो सांगतो, लेखक आणि दिग्दर्शनातील आत्तापर्यंतचा प्रवास प्रेरणादायक आहे. यापुढे सुद्धा यापेक्षा चांगलं, सशक्त देण्याची इच्छा आहे. एकावेळी एकच चित्रपट करायचा हे तत्व मी लक्षात ठेवलं आहे. एमपीएम च्या यशाविषयी सर्व रसिक प्रेक्षकांचं यश आहे. ज्या प्रकारे त्यांनी स्वप्नील-मुक्ता या जोडीवर, कथेवर पे्रम केलं त्यासाठी प्रेक्षकांचे आभार. हे यश स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, निर्माते आणि संपूर्ण टीमचं आहे.
- मी ड्रीम रोल वगैरे पाहून भूमिकांची निवड करत नाही. त्या पात्राने मला जर प्रेरणा दिली तर मी त्या भूमिकेची निवड करतो. वाचन , आजूबाजूला घडणाºया गोष्टींवर लक्ष ठेवत असतो. प्रेक्षक म्हणून ती कल्पना आवडते का, पटते का याचा विचार करतो. सिनेमा बनवणं हे टीमवर्क आहे. त्यामुळे भन्नाट कल्पनांच नेहमी स्वागत करून त्यांचा सिनेमात प्रयोग करतो.
- सतिश राजवडे
माझा अत्यंत लाडका मित्र, अभिनय करणाºयांना दिलासा देण्याची कला असलेला आणि नेमकेपणाने गोष्ट मांडणारा दिग्दर्शक आहे. त्याची काम करण्याची वेगळीच पद्धत आहे. मुंबई पुणे मुंबईचा तिसरा भाग असूनसुद्धा त्याच उमेदीने, उत्साहाने तो काम करतो आहे. त्याने अश्याच वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांना देत राहाव्यात यासाठी त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
- स्वप्नील जोशी
सतीश राजवाडे सर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात आणि माझे आवडते दिग्दर्शक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! सतीश सर अत्यंत छान स्वभावाचे आहे. मी त्यांना मुंबई पुणे मुंबई 3 च्या शूटिंग वर भेटले पण वाटले नाही की मी त्यांना पहिल्यांदा भेटले. मुंबई पुणे मुंबई(२०१०) या अत्यंत गाजलेल्या चित्रपटापासून मी त्यांच्या सिनेमांची खूप मोठी फॅन झाली आहे. प्रत्येक विषय खूप सुंदररित्या हाताळतात. सतीश सर, असेच सुंदर चित्रपट बनवत राहा आणि असेच आम्हाला आपल्या प्रेमात पाडत राहा.
- नमिता पाटोळे
तो एक कुशल दिग्दर्शक आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. माझीही इच्छा होती की त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करता यावं. पण त्याच्याबरोबर सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. टाईम बरा वाईट या सिनेमातील 'भाई' पात्रामध्ये तो मुरल्यासारखा वाटत होता. भाई म्हणून तो वापरत असलेली भाषा, बोलण्याची पद्धत हे सारंच आमच्यासाठी नवीन होतं. राहुल भटणकरचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला हा सिनेमा होता. परंतु या क्षेत्रात इतका अनुभव असूनसुद्धा 'मी इथे फक्त अभिनय करायला आलो आहे' हे ध्यानात घेऊन राहुलला आपल्या अभिनयातून काय अपेक्षित आहे हे पाहण्याकडे त्याचा कल होता. त्याचं हे अनपेक्षित आणि मला प्रचंड भावलेलं रूप होतं त्यामुळे मला काम करताना कसलंही दडपण आलं नाही. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
- भूषण प्रधान
मी कुठला सिनेमा पाहिला की मला उत्सुकता असते टेक्निकल टीमची. दिग्दर्शक, एडिटर, सिनेमॅटोग्राफर कोण आहे हे बघण्याकडे माझा कल असतो. जेव्हा मुंबई पुणे मुंबई पाहिला तेव्हा कळलं पहिल्यांदा सतिश राजवाडेंबद्दल. या सिनेमामध्ये कमालीची गोष्ट अशी की या माणसाने फक्त २ लोकांना घेवून अप्रतिम सिनेमा बनवला. फक्त कथा आणि संवाद यांच्या जोरावर एका सिनेमाची पातळी किती वाढते हे त्यांनी दाखवून दिले. मी प्रेग्नंट असताना ९ महिने रोज एकदा एमपीएम पाहिला आहे. इतका हुशार आणि पारदर्शक आहे तो हे त्याच्या सिनेमामधून स्पष्ट दिसून येते. सतीश सरांचे राहणीमान खूप साधे जरी असले तरीही त्यांच्या लिखाण, दिग्दर्शन आणि अभिनयामध्ये खूप ताकत आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपट आणि टीव्ही सिरियल्सची खूप वेडी फॅन आहे. मी त्यांना आजपर्यंत कधी भेटले नाही पण एकदा भेटण्याची मनापासून ईच्छा आहे. सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! मी असंच तुम्हाला नेहमी फॉलो करत राहीन तुमच्यावरचं प्रेम आयुष्यात कधीही कमी होणे शक्य नाही.
- रश्मी जोशी