अशी सुरु झाली अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 19:00 IST2020-03-25T18:53:32+5:302020-03-25T19:00:17+5:30

मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलाचा आज वाढदिवस आहे.

Birthday special swapnil patil and astad kale love story gda | अशी सुरु झाली अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी..

अशी सुरु झाली अभिनेत्री स्वप्नाली पाटील आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी..

मराठी अभिनेत्री स्वप्नाली पाटीलाचा आज वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे निमित्ता जाणून घेऊया तिची आणि आस्ताद काळेची लव्हस्टोरी...


अनेक वर्षांपूर्वी एका मालिकेचा पायलट एपिसोड शूट करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आस्ताद आणि स्वप्नाली दोघे भाऊ-बहीण होते. त्यानंतर जवळजवळ तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचे पाऊल या मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाल्यानंतर या दोघांची मैत्री झाली आणि काहीच महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला.


आस्तादने स्वप्नालीला प्रपोज केले नाही. मात्र मनात काय हे बोललेच पाहिजे असा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे स्वप्नालीला त्याने तू मला आवडतेस असे सांगितले. त्यावर या गोष्टीचा विचार करू दे असे उत्तर स्वप्नालीने त्याला दिलं आणि जवळजवळ वर्षभरानंतर होकार कळवला होता. 


आस्तादने त्याच्या प्रेमाची कबुली बिग बॉस मराठीत दिली, त्यावेळी स्वप्नाली तिच्या कुटुंबियांसोबत हा कार्यक्रम पाहात होती. यावर तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया काय होती यावर स्वप्नाली सांगते, मी आणि आस्ताद हे चांगले मित्रमैत्रीण असल्याचे माझ्या घरातल्यांना माहीत होते. पण मैत्रीपेक्षा आमच्यात अधिक काही आहे याची कल्पना त्यांना नव्हती.

माझ्या आईला थोडासा संशय होता. पण वडिलांना काहीच माहीत नव्हते. हा भाग आम्ही घरातील सगळे मिळून पाहात होतो. हा कार्यक्रमात माझ्याविषयी बोलेल याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. त्याने कार्यक्रमात कबूल केल्यानंतर माझ्या वडिलांनी फक्त माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले आणि बोलव आता त्याला भेटायला असे ते म्हणाले....

Web Title: Birthday special swapnil patil and astad kale love story gda