Neha Shitole: महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता... ‘बिग बॉस मराठी’ फेम नेहा शितोळेची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:25 IST2022-07-21T13:20:19+5:302022-07-21T13:25:57+5:30
Neha Shitole: ‘बिग बॉस मराठी 2’मुळे घराघरात पोहोचलेली नेहा शितोळे हिने महेश मांजरेकरांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. कारणही आहे खास...

Neha Shitole: महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता... ‘बिग बॉस मराठी’ फेम नेहा शितोळेची खास पोस्ट
‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 2) या शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा शितोळे (Neha Shitole) आता गीतकार झाली आहे. ‘बिग बॉस मराठी 2’नंतर नेहा धाकड गर्ल म्हणून चर्चेत आली. आता तिने नवी इनिंग सुरू करत, एका मोठ्या मराठी चित्रपटासाठी गाणं लिहिलं आहे. होय, महेश मांजरेकरांच्या ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2 ) या चित्रपटासाठी नेहाने एक गीत लिहिलं आहे. ‘देह पेटू दे...,’ असे या शब्दाचे बोल आहेत. काल हे गाणं रिलीज झालं आणि सध्या या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आपल्या पहिल्यावहिल्या गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून नेहा भारावली नसेल तर नवल. गीतकार म्हणून संधी दिल्याबद्दल तिने महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचे खास आभार मानले आहेत. त्यांच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
‘महेश मांजरेकर हा माणूस आयुष्यात नुसता भेटणं सुद्धा जिथे कमाल वाटतं तिथे त्यांनी तुम्हाला appreciate करणं, त्यांच्या सोबत काम करायला मिळणं आणि त्यांचं थोडं प्रेम आपल्या वाट्याला येणं... हे सगळं अविश्वसनीय आहे... थँक्यू महेश मांजरेकर सर, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल...एका वेगळया रुपात लोकांसमोर आणल्या बद्दल... माज्या शब्दांना योग्य न्याय दिल्याबद्दल...,’ अशी पोस्ट नेहाने लिहिली आहे.
नेहाने लिहिलेल्या आणि हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नेहावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
नेहा शितोळे ‘बिग बॉस मराठी 2’मुळे चर्चेत आली होती. शोमुळे नेहा प्रचंड लोकप्रिय झाली होती. नेहाने ‘देऊळ’ या चित्रपटातून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यांनतर तिने अनेक चित्रपट केले आहेत.