स्पृहा बनली सायकल क्वीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 13:53 IST2016-11-19T13:53:29+5:302016-11-19T13:53:29+5:30
लहानपणापासून प्रत्येकाला सायकल शिकण्याची भारी हौस असते. कारण सायकल शिकलो की, गाडी चालविण्यास येते असा नियमच लहानपणापासून प्रत्येकाच्या डोक्यात ...
स्पृहा बनली सायकल क्वीन
ल ानपणापासून प्रत्येकाला सायकल शिकण्याची भारी हौस असते. कारण सायकल शिकलो की, गाडी चालविण्यास येते असा नियमच लहानपणापासून प्रत्येकाच्या डोक्यात जाम बसविला जातो. त्यामुळे किती ही पडलो तर सायकल शिकतोच. अशाच या सायकलची मोठी फॅन अभिनेत्री स्पृहादेखील झालेली दिसत आहे. कारण नुकताच तिचा सोशल मिडीयावर सायकल शिकतानाचा एक फोटो अपलोड करण्यात आला आहे. तिचा हा फोटो अभिनेता जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर दोन इन्सट्रक्टर असे स्टेटसदेखील अपडेट केले आहे. तिच्या या सायकल चालविण्याच्या परिक्षेत मात्र स्पृहा पास झालेली दिसत आहे. कारण जयवंत यांनी त्यांच्या पोस्टमधून सायकल क्वीन अशी पदवीदेखील तिला बहाल केलेली आहे. त्यांचा हा फोटो सेटवरच्या चित्रिकरणदरम्यानचा असलेला पाहायला मिळत आहे. तसेच या सर्व कलाकरांनी सायकल शिकताना व शिकविताना खूपच धमाल केलेली देखील पाहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोला सोशल मीडियावर भरभरून लाइक्स मिळताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व कलाकारांचा हा फोटो कोणत्या चित्रपटाच्या सेटवरचा आहे हे अदयापदेखील कळाले नाही. मात्र स्पृहा तिच्या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना सायकल चालविताना पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे. यापूर्वी स्पृहाने मोरया, मायबाप, पैसा पैसा, लॉस्ट अॅण्ड फाउंड असे अनेक चित्रपट केले आहेत. त्याचबरोबर तिने अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका या मालिकेतूनदेखील तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता ती कोणत्या चित्रपटात झळकणार याची उत्सुकतादेखील तिच्या चाहत्यांना लागली आहे.