मराठी सिनेसृष्टीनंतर भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:36 IST2018-10-24T17:35:57+5:302018-10-24T17:36:44+5:30

'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी' हे मराठी चित्रपट व पिंजरा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Bhushan Pradhan is ready to make an impression in Bollywood after the Marathi film | मराठी सिनेसृष्टीनंतर भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज

मराठी सिनेसृष्टीनंतर भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज

ठळक मुद्देभूषण प्रधान झळकणार रायमा सेनसोबत हिंदी चित्रपटात

'कॉफी आणि बरंच काही', 'आम्ही दोघी' हे मराठी चित्रपट व पिंजरा मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता भूषण प्रधान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो सिमी जोसेफ यांच्या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत एन्ट्री करणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री रायमा सेनसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भूषण प्रधान म्हणाला की, 'हो, मी हिंदी सिनेमा करतो आहे. या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. दिल्लीतील पहिल्या शेड्युलचे चित्रीकरण पूर्ण झाले असून दोन महिन्यात दुसऱ्या शेड्युलच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे.'
भूषण प्रधान पहिल्यांदाच रायमा सेनसोबत या चित्रपटाच्या निमित्ताने काम करतो आहे. याबाबत सांगताना भूषणा म्हणाला की, 'या चित्रपटात माझ्यासोबत रायमा दिसणार आहे. सेटवर आमची ओळख झाली आणि आता आम्ही चांगले मित्र झालो आहोत. आमचे वीस ते पंचवीस दिवसाचे शेड्युल होते आणि ते आम्ही पूर्ण केले आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. '


या सिनेमाची कथा मानवी तस्करीवर आधारीत असून यात सामाजिक संदेशदेखील देण्यात आला असल्याचे भूषणने सांगितले व पुढे म्हणाला की, हा फक्त एण्टरटेनिंग सिनेमा नसून यात खूप चांगला संदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत केलेल्या सिनेमांपेक्षा हा चित्रपट वेगळा आहे.
अद्याप या सिनेमाच्या शीर्षक व कथेबद्दल काहीही समजू शकलेले नाही. मात्र या चित्रपटात भूषण व रायमा यांच्याव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब व तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

Web Title: Bhushan Pradhan is ready to make an impression in Bollywood after the Marathi film