भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
By कोमल खांबे | Updated: September 19, 2025 12:03 IST2025-09-19T12:02:58+5:302025-09-19T12:03:45+5:30
"आमच्याकडे एक गोड सरप्राइज आहे", भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? 'त्या' पोस्टने चर्चेला उधाण

भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
भूषण प्रधान हा मराठी सिनेमातील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय अभिनेता आहे. भूषणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तो झळकला आहे. मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं. भूषणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि तो सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. आता भूषणने केलेल्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
भूषणने त्याच्या इन्स्टाग्रावरुन अभिनेत्री केतकी नारायणसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांनीही पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. पण, यातील पहिल्याच फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. केतकीच्या पोटावर भूषणने हात ठेवत मॅटर्निटी फोटोशूटसारखी पोझ दिल्याचं दिसत आहे. याशिवाय "आमच्याकडे एक गोड सरप्राइज आहे", असं कॅप्शनही त्याने या पोस्टला दिलं आहे. भूषणची ही पोस्ट पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.
अभिनेत्याने लग्न केलंय की लग्नाआधीच गुडन्यूज दिलीये? असा प्रश्न अनेकांनी कमेंटमध्ये विचारला आहे. "एक मिनिट तुझं लग्न कधी झालं?", "हे कधी घडलं?", "गेल्या दिवाळीत तो म्हणाला होता की लग्नाचं प्लॅनिंग करतोय...", "फोटो बघून नक्की काय ठरवायचं लग्न झालं आहे की पोर बाळ होणार आहे", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्याचं अभिनंदनही केलं आहे. आता भूषण आणि केतकीकडे खरंच गुडन्यूज आहे? की कोणत्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा भाग आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, त्याच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढवली आहे.