'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:12 PM2024-07-11T16:12:16+5:302024-07-11T16:13:02+5:30

व्हिडिओवर अनुषाने दिलेल्या कॅप्शनने आणि भूषणच्या कमेंटने लक्ष वेधून घेतलंय

Bhushan Pradhan and Anusha Dandekar coffee date video actress gave interesting caption | 'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली?

'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस', भूषण प्रधान-अनुषाची कॉफी डेट; दिली प्रेमाची कबुली?

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधान (Bhushan Pradhan) सध्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा 'जुनं फर्निचर' सिनेमा येऊन गेला. तर आता तो आगामी 'घरत गणपती' सिनेमात झळकणार आहे. 'जुनं फर्निचर' मधील सहअभिनेत्री अनुषा दांडेकरला (Anusha Dandekar) तो डेट करत असल्याच्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अनुषाने भूषणसोबत एक रोमँटिक रील व्हिडिओ शेअर केला आहे. तिने पोस्टला दिलेलं कॅप्शनही चर्चेत आहे.

अनुषा दांडेकर भूषणसोबत कॉफी डेटवर आली आहे. भूषण कॉफी पित असताना ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते. तेवढ्यात भूषण  तिचा हात पकडतो. अनुषा म्हणते, 'सोड माझा हात'. तर भूषण म्हणतो, 'सोडण्यासाठी हात धरत नाही मराठी माणूस.' यानंतर दोघंही हसतात. कारण हा सीन भूषणच्या आगामी 'घरत गणपती' मधला आहे. या व्हिडिओला अनुषाने कॅप्शन देत लिहिले, 'जेव्हा तो कॉफी डेट वर असतो पण शेवटी हा फिल्मचा सीन होतो. मला हाताचं माहित नाही पण हा मराठी सिनेमा नक्कीच सोडणार नाही. सगळ्यांनी घरत गणपती नक्की बघा नाहीतर भूषण सगळीकडे असंच वागत राहील. टीमला शुभेच्छा."

अनुषाच्या या कॅप्शनवर भूषणने कमेंट करत लिहिले, 'हाहाहा कॅप्शन एकदमच जमलंय. हो सिनेमा तर मी सोडणार नाही आणि् हाताचं सांगायचं तर...व्हिडिओ नीट बघा.' 

भूषण आणि अनुषाच्या या व्हिडिओवर मराठी कलाकारांनीही कमेंट केल्यात. पूजा सावंतने कमेंट करत 'क्यूट' म्हटलं आहे. प्रार्थना बेहेरे, स्मिता शेवाळे, अश्विनी भावे, समिधा गुरु यांनी हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. यावरुन भूषण आणि अनुषा खरंच एकमेकांना डेट करत आहेत यावर जवळपास शिक्कामोर्तबच झालं आहे. आता दोघंही अधिकृत घोषणा कधी करतात याची सगळेच वाट पाहत आहेत. 

भूषण प्रधानचा आगामी 'घरत गणपती' हा सिनेमा २६ जुलैपासून प्रदर्शित होत आहे. यामध्ये अजिंक्य देव, अश्विनी भावे, निकीता दत्ता यांचीही भूमिका आहे.

Web Title: Bhushan Pradhan and Anusha Dandekar coffee date video actress gave interesting caption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.