​भुषण पाटील हे भवानी गाण्यामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 15:47 IST2017-04-20T10:17:39+5:302017-04-20T15:47:39+5:30

भुषण पाटीलने ओळख माय आयडेन्टीटी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कौन जितेगा बॉलिवूड का तिकिट, परफेक्ट बॅचलर या ...

Bhushan Patil in Bhavani song | ​भुषण पाटील हे भवानी गाण्यामध्ये

​भुषण पाटील हे भवानी गाण्यामध्ये

षण पाटीलने ओळख माय आयडेन्टीटी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कौन जितेगा बॉलिवूड का तिकिट, परफेक्ट बॅचलर या रिअॅलिटी शोचा तो विजेतादेखील ठरला होता. त्याने बर्नी, विसर्जन यांसारख्या मराठी चित्रपटांमधून त्याचे अभिनय कौशल्यदेखील दाखवले आहे. तसेच तो सोनू कक्करच्या अखिया नू रेह दे आणि इशेता सरकारच्या प्यार का हँगओव्हर या अल्बममध्ये झळकला होता. आता तो अजून एका अल्बममध्ये झळकणार आहे. 
हे भवानी हे गाणे लवकरच युट्युब प्रेमींना ऐकायला मिळणार आहे. हे गाणे नुकतेच रिलिज करण्यात आले. त्यावेळी या गाण्याशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते. हे भवानी या गीतात प्रेक्षकांना एक कथा पाहायला मिळणार आहे. सध्याच्या आधुनिक जगात आंतरजातीय विवाह करणे हे काही नवीन नाही. या गाण्यातदेखील अशाच एका जोडप्याची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  आपल्या मुला-मुलीच्या प्रेमासाठी त्यांच्या घरातले धुमधडाक्यात त्यांचे लग्न करून देतात. मराठी संस्कृतीमध्ये लग्नानंतर गोंधळ घालणे हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे हाच गोंधळ प्रेक्षकांना या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हे गाणे शलाका देशपांडे यांनी लिहिले असून मराठी आणि हिंदी भाषेचे यात फ्यूजन करण्यात आले आहे तर नितेश मोरे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. आदर्श शिंदेने त्याच्या दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. या गाण्यात भुषणसोबत प्रेक्षकांना तानिया कालरा पाहायला मिळणार आहे. तानियाने हिंदीत काम केले असून पहिल्यादांच ती मराठी अल्बममध्ये दिसणार आहे. तसेच यात वैशाली नाईक, समरजितसिंग, हरप्रीतसिंग, सुधांशू पाठक, वंदना मराठे, रजनी वैद्य, सोनिया गौतम यांच्यादेखील भूमिका आहेत. 


Web Title: Bhushan Patil in Bhavani song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.