"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 08:46 IST2023-05-09T08:45:47+5:302023-05-09T08:46:18+5:30

मी कितीदा मागे लागलो त्यांच्या की मला प्रमोशनला येऊ द्या पण...

bhaurao karhade marathi director accused chala hawa yeu dya show for not giving him chance to promtote TDM | "चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल

"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल

मराठी दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाला फारसे शोज न मिळाल्याने भाऊराव कऱ्हाडे आणि कलाकार अक्षरश: थिएटरमध्ये रडले. मराठी लोकच आपल्या मराठी सिनेमांना पाठिंबा देत नाही हे दिसून आलं. इतकंच नाही तर मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही एकमेकांच्या सिनेमांसाठी फारसं उभं राहत नाही हे दिसून आलं. आता भाऊराव कऱ्हाडे यांनी 'चला हवा येऊ द्या'च्या टीमवर गंभीर आरोप केलाय. प्रमोशनला येऊ दिलं नसल्याचा खुलासा कऱ्हाडे यांनी एका मुलाखतीत केला.

'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय मराठी विनोदी कार्यक्रम आहे. अनेक चित्रपटांचे प्रमोशन या शोमध्ये केले जाते. 'ऑड इंजिनिअर' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भाऊराव कऱ्हाडे म्हणाले,"चला हवा येऊ द्या कार्यक्रम आहे. मी कितीदा मागे लागलो त्यांच्या की मला प्रमोशनला येऊ द्या पण ते नाही म्हणाले. ख्वाडा सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं होतं. नंतर बबन सिनेमाच्या वेळी बोलवतील असं वाटलं होतं. पण त्यांनी संधी दिली नाही. आता टीडीएम साठी दीड महिन्यांपासून मी त्यांच्या मागे लागलोय की मला संधी द्या. पण ते म्हणतात या आठवड्यात एका सिनेमाचं प्रमोशन आहे. मी आधीच्या आठवड्यात येतो म्हणलं किंवा पुढच्या आठवड्यात. पण संधी तरी द्या..."

भाऊराव कऱ्हाडे यांनी या मुलाखतीमधून इंडस्ट्रीची पोलखोल केली आहे. त्यांच्या टीडीएम सिनेमावेळीच केदार शिंदेंचा महाराष्ट्र शाहीर रिलीज झाला. या सिनेमाला बरेच स्क्रीन्स मिळाले. कोणता हिंदी सिनेमाही स्पर्धेत नव्हता तरी भाऊरावच्या सिनेमाला शोज न दिल्याने सर्वच नाराज झाले आहेत.

Web Title: bhaurao karhade marathi director accused chala hawa yeu dya show for not giving him chance to promtote TDM