भाऊ कदम हाफ तिकीट चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:38 IST2016-06-16T08:08:02+5:302016-06-16T13:38:02+5:30

            ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सगळ्यांच्या घरात पोहचलेले अभिनेते भाऊ कदम यांनी ...

Bhau Kadam Half Ticket movie | भाऊ कदम हाफ तिकीट चित्रपटात

भाऊ कदम हाफ तिकीट चित्रपटात

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">
            ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून सगळ्यांच्या घरात पोहचलेले अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. हास्य सम्राट म्हणून पण त्यांना ओळखले जाते. भाऊंचे आगामी प्रोजेक्ट्स कोणते हे जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक असणार ना. भाऊ सांगत आहेत त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी.“२२ जुलै रोजी समित कक्कड दिग्दर्शित हाफ तिकीट या चित्रपटातून मी येत आहे. ही वेगळी भूमिका आहे आणि दिग्दर्शक समित कक्कड यांनी मला प्रोत्साहित केलं. दोन लहानमुलांसोबत काम केले जे कठीण होते. कारण माहित असलेल्या कलाकारांसोबत काम करणे एकवेळ सोपे असते. पण हसत-खेळत मी आणि हाफ तिकीट लहान मुलांनी काम केलं. प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘सायकल’ हा पण माझा आगामी चित्रपट आहे.”

                 

Web Title: Bhau Kadam Half Ticket movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.