हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
By कोमल खांबे | Updated: May 3, 2025 14:55 IST2025-05-03T14:55:01+5:302025-05-03T14:55:55+5:30
अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.

हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी नट म्हणजे भरत जाधव. अतिशय मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर त्यांनी सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. अभिनयाची उत्तम जाण असणारे भरत जाधव गेली कित्येक वर्ष रंगभूमीची सेवा करण्यासोबत प्रेक्षकांचंही अविरतपणे मनोरंजन करत आहेत. अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं.
भरत जाधव यांनी नुकतीच लोकशाही या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये न दिसण्यामागचं कारण सांगितलं. ते म्हणाले, "मला हिंदी सिनेमांसाठी कोणी विचारलच नाही. खूप वर्षांपूर्वी मला नोकराची एक भूमिका ऑफर केली होती. पण, मी तेव्हा नाही म्हटलं. चांगलं काम आलं तर मी नक्कीच करेन. आता मी हिंदी वेब सीरिजमध्ये वगैरे काम करतो. स्कॅम २ मध्ये काम केलं. आता मटका किंग सीरिज येईल. त्यात माझी चांगली भूमिका आहे. त्यावेळी हिरोच्या ओरिएनटेंड वेगळेच सिनेमे असायचे. आता हिंदीतही बदललं आहे. आता ते कॅरेक्टरला हिरो करतात. नवाजुद्दीन, राजकुमार राव हिट झाले कारण, तशा भूमिका होत्या. अशा वेगळ्या पात्रांसाठी आता विचारणा होतो. चांगलं असेल तर मी करतो. नाहीतर करत नाही".
दरम्यान, भरत जाधव 'आता थांबायचं नाय' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, रोहिणी हट्टांगडी, पर्ण पेठे, ओम भूतकर अशी स्टारकास्ट आहे.