भरत जाधव पुन्हा खळखळून हसवायला सज्ज !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 15:41 IST2016-09-03T06:25:00+5:302016-09-03T15:41:47+5:30
‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘लोच्या झाला रे’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘ढॅण्टॅढॅन’ अशा बऱ्याच नाटकांद्वारे भरत आणि ...
.jpg)
भरत जाधव पुन्हा खळखळून हसवायला सज्ज !!!
या दोघांच्या जोडीने आतापर्यंत सिनेमा आणि नाटकांच्या माध्यामातून रसिकांचं निखळ मनोरंजन केले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता अशी यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांसाठी आता काय नवीन घेऊन येणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. लवकरच हे दोघे ‘सौजन्याची ऐशीतैशी’ हे नाटक रंगमंचावर घेऊन येत आहेत.
या नाटकात आपल्याला भरत एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. चंद्रलेखा प्रकाशित सौजन्याची ऐशीतैशी हे नाटक अजीत भूरे, केदार शिंदे आणि भरत जाधव सादर करणार आहेत. अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे हे या नाटकाची निर्मिती करत आहेत. या नाटकातून केदार आणि भरतची जोडी आता काय कमाल करते हे पाहणं उत्सुकतेच ठरेल.