माझा मोबाईल अक्षरक्ष: लुटून नेला...! मुंबईच्या धो-धो पावसाचा भारत गणेशपुरेंना असाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 10:53 IST2020-08-07T10:50:17+5:302020-08-07T10:53:38+5:30

पाऊस आणि वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या भारत गणेशपुरेंनी शेअर केला व्हिडीओ

bharat ganeshpure share bad experience of thieving mobile in-mumbai | माझा मोबाईल अक्षरक्ष: लुटून नेला...! मुंबईच्या धो-धो पावसाचा भारत गणेशपुरेंना असाही फटका

माझा मोबाईल अक्षरक्ष: लुटून नेला...! मुंबईच्या धो-धो पावसाचा भारत गणेशपुरेंना असाही फटका

मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने सगळ्यांचीच दाणादाण उडाली. गेल्या 3-4 दिवस धो-धो कोसळणा-या पावसाने मुंबईला अक्षरश: धुवून काढले. अनेकांना पावसाचा फटका बसला. लोक अडकून पडले, अनेक वस्त्या जलमय झाला. रस्तेच नव्हे तर रस्त्यांवरील वाहने पाण्यात बुडाली. अशात  ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे  यांना अतिशय वाईट अनुभव आला.  होय,   पावसामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या गणेशपुरेंचा मोबाईल फोन दोन भामट्यांनी लंपास केला.
एक व्हिडीओ शेअर करत  भारत गणेशपुरे यांनी हा अनुभव शेअर केला आहे.  शिवाय स्थितीचा फायदा घेऊन लुटणा-या अशा टोळक्यांपासून सावध राहण्याचे आवाहनही केले.

    ‘आज माझा मोबाईल अक्षरक्ष: लुटून नेला. ही घटना वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदवलीजवळ घडली. खूप पाऊस होता. काल दरड कोसळल्यामुळे खूप ट्रॅफिक होते,’ असे सांगत ही घटना नेमकी कशी घडली याची सविस्तर माहिती भारत गणेशपुरे यांनी या व्हिडीओतून दिली आहे. 

 तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल...
कोरोनामुळे फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती तुमच्या गाडीमध्ये सेंटर लॉक असेल तर आधी गाडी लॉक करा. काच उघडू नका. तुम्हाला कुणी निर्दयी म्हटले तरी चालेल. दिवस सध्या वाईट आहेत. याच्यामध्ये बायका, लहान मुले असतात. त्यांच्याकडून-मागची खिडकी उघडी आहे, गाडीच्या समोर स्पार्क होत आहे किंवा मागच्या टायरमध्ये हवा नाही आहे, असे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जाईल. पण गाडीतून तुम्ही उतरू नका. काळजी घ्या. माझा मोबाइल माझ्या मुर्खपणामुळे या टोळीने लुटून नेला आहे, असे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

Web Title: bharat ganeshpure share bad experience of thieving mobile in-mumbai