भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - "एकमेकांसोबत राहण्याचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 12:24 IST2024-04-10T12:23:34+5:302024-04-10T12:24:55+5:30

Bhagyashree Mote : भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे.

Bhagyashree Mote's engagement is broken! After breaking up with Vijay she says - "To be with each other..." | भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - "एकमेकांसोबत राहण्याचा..."

भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - "एकमेकांसोबत राहण्याचा..."

मराठी कलाविश्वातील अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. परंतु, आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. 

भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, नमस्कार मित्रांनो. तुम्हासा सांगू इच्छिते की, बराच काळ एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर मी आणि विजयने चांगल्या कारणांसाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही चांगले मित्र राहणार आहोत. कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा. धन्यवाद.

भाग्यश्रीने सोशल मीडियावर मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे(Vijay Palande)ला डेट करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर २०२२मध्ये त्यांचा साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याला हृतिक रोशनने हजेरी लावली होती. मात्र आता ते दोघे वेगळे झाले आहेत. त्यांचे वेगळ्या होण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

वर्कफ्रंट
भाग्यश्री मोटे हिने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' या चित्रपटात दिसली होती. तिने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. तिने बऱ्याच मराठी मालिकेतही काम केले आहे.

Web Title: Bhagyashree Mote's engagement is broken! After breaking up with Vijay she says - "To be with each other..."