भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 07:15 IST2019-11-07T07:15:00+5:302019-11-07T07:15:00+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

Bhagyashree mote shares her glamorous photo on social media | भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या  फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.


भाग्यश्री नुकताच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत भाग्यश्री दिसतेय. भाग्यश्री या फोटोत खूपच सुंदर दिसतेय. या फोटोंवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. खूप सुंदर, परी अशा कमेंट्स भाग्यश्रीच्या फोटोवर तिच्या फॅन्सनी केल्या आहेत. 


 भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. 


भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे.  

Web Title: Bhagyashree mote shares her glamorous photo on social media