ती पाहताच बाला, कलेजा खलास झाला भाग्यश्री मोटेचे फोटो तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 08:00 IST2019-03-07T08:00:00+5:302019-03-07T08:00:00+5:30

भाग्यश्री मोटेचं रुपेरी पडद्यावर 'पाटील', 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे.

Bhaghayshree Mote’s Hot & Sexy photo Will clean bold you | ती पाहताच बाला, कलेजा खलास झाला भाग्यश्री मोटेचे फोटो तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड !

ती पाहताच बाला, कलेजा खलास झाला भाग्यश्री मोटेचे फोटो तुम्हालाही करेल क्लीन बोल्ड !

अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या या फोटोंमधील मादक अदा कुणालाही अक्षरक्ष: वेड लावतील अशाच असतात. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय. याच फोटोंच्या यादीत भाग्यश्रीच्या आणखी एका नव्या फोटोची भर पडली आहे. नव्या फोटोशूटमधील भाग्यश्रीचा हा फोटो कुणालाही क्लीन बोल्ड करेल. जॅकेट परिधान करून हॉट पोज दिलेला भाग्यश्रीचा हा फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल की पाहताच ती बाला, कलेजा खल्लास झाला.

भाग्यश्री मोटेचं रुपेरी पडद्यावर 'पाटील', 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा विविध चित्रपटात काम केलं आहे. भाग्यश्री लवकरच तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या मादक अदांचा जलवा दाखवणार आहे. याशिवाय भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

Web Title: Bhaghayshree Mote’s Hot & Sexy photo Will clean bold you