'भाभीजी' फेम फाल्गुनी रंजनी झळकणार या मराठी सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:45 IST2018-09-01T16:36:33+5:302018-09-01T16:45:00+5:30

'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून, सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला अश्या मराठीतील प्रसिद्ध युवा कलाकारांची गँँग या सिनेमात आहे.   

Bhabhiji fame falguni ranjan will seen in this matatahi movie | 'भाभीजी' फेम फाल्गुनी रंजनी झळकणार या मराठी सिनेमात

'भाभीजी' फेम फाल्गुनी रंजनी झळकणार या मराठी सिनेमात

ठळक मुद्दे फाल्गुनी रंजनी आता 'पार्टी' या चित्रपटाद्वारे मराठीत येत सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी दिसणार आहेत

'भाभीजी घर पर है?' या गाजलेल्या विनोदी मालिकेतील गुल्फाम कळी आठवते का? तिची घायाळ नजर आणि दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करणारी हि कळी म्हणजेच हिंदी अभिनेत्री फाल्गुनी रंजनी आता 'पार्टी' या चित्रपटाद्वारे मराठीत येत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या सिनेमांत ती एका हटके अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 'पार्टी' सिनेमाची प्रस्तुती सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते असलेले डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांनी केली असून,  नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून, सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला अश्या मराठीतील प्रसिद्ध युवा कलाकारांची गँँग या सिनेमात आहे.   

 सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धमाल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडीचं दुखणंदेखील यात दिसून येते. तसेच प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील यात दिसून येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधील 'घराचा व गाडीचा हफ्ता भरताना मैत्रीचादेखील हफ्ता भरायचा असतो, हे विसरून जातो आपण' हा संवाददेखील प्रेक्षकांना भावूक करून टाकतोय. आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण 'पार्टी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना करून देतोय. हा ट्रेलर लाँच होऊन काहीच तास झाले असले तरी या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
 

Web Title: Bhabhiji fame falguni ranjan will seen in this matatahi movie